Ashadhi Wari 2025: आली आषाढी वारी, रेल्वे नेणार पंढरीच्या दारी! भाविकांसाठी 80 गाड्या, वेळापत्रक
काय आहे योजना?
महाराष्ट्र शासनाने आषाढी वारीसाठी पंढरपूरला जाणाऱ्या भाविकांसाठी ‘विठ्ठल रखुमाई वारकरी योजना 2025’ जाहीर केली आहे. यामध्ये 16 जून ते 10 जुलै 2025 या कालावधीत अपघात अथवा दुर्घटनेत मृत्यू झालेल्या किंवा जखमी झालेल्या वारकऱ्यांसाठी मदत दिली जाणार आहे. त्यामधेट अपघाताने मृत्यू झालेल्या व्यक्तींच्या वारसांना 4 लाख रुपयांची मदत केली जाईल. तर वारी दरम्यान अपंगत्व आल्यास वारकऱ्यांना 40 ते 60 टक्के अपंगत्व आल्यास 74 हजार रुपये, 60 टक्क्यांहून अधिक अपंगत्व आल्यास 2 लाख 50 हजार रुपये मदत देण्यात येईल. एक आठवड्यापेक्षा जास्त दिवस रुग्णालयात राहिल्यास 16 हजार रुपये, तर एक आठवड्यापेक्षा कमी कालावधीसाठी रुग्णालयात दाखल झाल्यास 5 हजार 400 रुपयांची मदत देण्यात येणार आहे.
advertisement
योजनेसाठी आवश्यक बाबी
- ही योजना आषाढी वारीसाठी पंढरपूर येथे पायी, खासगी किंवा सार्वजनिक वाहनाने जाणाऱ्या वारकऱ्यांकरीता लागू राहणार आहेत.
- मदतीचा दावा करणाऱ्या वारकरी किंवा त्यांच्या वारसांना जिल्हाधिकाऱ्यांकडे अर्ज करणे आवश्यक आहे.
- अर्जासोबत संबंधित वारकरी आषाढी यात्रेकरीता पंढरपूर येथे गेल्याबाबत संबंधित तहसीलदार यांचे प्रमाणपत्र आवश्यक राहील.
- सर्व तहसीलदार संबंधित वारकरी यात्रेकरीता गेल्याची खात्री करून तशा स्वरूपाचे प्रमाणपत्र मागणीनुसार संबंधित वारकरी व त्यांच्या वारसदारांना निर्गमीत करणार आहेत.