Ashadhi Wari 2025: आली आषाढी वारी, रेल्वे नेणार पंढरीच्या दारी! भाविकांसाठी 80 गाड्या, वेळापत्रक
- Published by:Shankar Pawar
- local18
Last Updated:
Ashadhi Wari 2025: आषाढी वारीसाठी राज्यातून मोठ्या संख्येने भाविक पंढरीकडे येतात. यासाठी मध्य रेल्वे 80 हून अधिक विशेष गाड्या चालवणार आहे.
नागपूर: आषाढी वारीसाठी राज्यभरातून भाविक पंढरीकडे निघाले आहेत. यामध्ये रेल्वे प्रवाशांची संख्या मोठी असते. त्यासाठी मध्य रेल्वेतर्फे 10 जुलैपर्यंत पंढरपूर आणि मिरजसाठी 80 विशेष गाड्यांची सेवा उपलब्ध करण्यात आली आहे. नागपूर, अमरावती, भुसावळ आणि विदर्भातील इतर स्थानकांवरून पंढरपूरला जाण्यासाठी रेल्वे सेवा उपलब्ध राहणार आहे. त्यामुळे भाविकांची मोठी सोय होणार आहे.
मध्य रेल्वेकडून नागपूर- मिरज, न्यू अमरावती- पंढरपूर विशेष, खामगाव-पंढरपूर विशेष, भुसावळ-पंढरपूर अनारक्षित विशेष अशा एकूण 80 रेल्वे गाड्या पंढरीकडे धावणार आहेत. तसेच रेल्वेच्या सोबतच एसटी महामंडळाने देखील आषाढी वारीसाठी तयारी केली असून जादा बस सोडण्यात येणार आहेत. तर राज्य सरकारने पंढरीला जाणाऱ्या वाहनांसाठी टोलमाफीचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे भाविकांना सोयीने प्रवासाची संधी उपलब्ध झाली आहे.
advertisement
पंढरीसाठी धावणार या गाड्या
नागपूर ते मिरज
नागपूर ते मिरज दरम्यान धावणारी ही गाडी 4 आणि 5 जुलैला सकाळी 8.30 वाजता सुटेल. दुसऱ्या दिवशी 11.55 वाजता मिरज येथे पोहोचेल. या गाडीला वर्धा, पुलगांव, धामणगाव, चांदुर, बडनेरा, मुर्तिजापूर, अकोला, शेगाव, मलकापूर, भुसावळ, जळगाव, चाळीसगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड, कुर्डुवाडी, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, कवठे महाकाळ, सलगरे आणि अरग हे थांबे असतील.
advertisement
अमरावती ते पंढरपूर
अमरावतीहून पंढरपूरसाठी 2 आणि 5 जुलै रोजी दुपारी 2 वाजून 40 मिनिटांनी सुटेल. तर पंढरपुरात दुसऱ्या दिवशी सकाळी 9.10 वाजता पोहोचेल. या गाडीला बडनेरा, मूर्तिजापूर, अकोला, शेगाव, लंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी येथे थांबे असतील.
खामगाव ते पंढरपूर
खामगावहून पंढपूरसाठी 3 आणि 6 जुलै रोजी सकाळी 11.30 वाजता ही गाडी सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता ती पंढरपूरला पोहोचेल. या गाडीला जलंब, नांदुरा, मलकापूर, बोदवड, भुसावळ, जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगाव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी हे थांबे असणार आहेत.
advertisement
भुसावळ पंढरपूर अनारक्षित
भुसावळ येथून 5 जुलै रोजी दुपारी 1.30 वाजता पंढरपूरसाठी गाडी सुटेल. दुसऱ्या दिवशी पहाटे 3.30 वाजता पंढपुरात पोहोचेल. या गाडीला जळगाव, पाचोरा, चाळीसगाव, नांदगांव, मनमाड, कोपरगाव, बेलापूर, अहमदनगर, दौंड आणि कुर्डुवाडी हे थांबे असतील.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
July 02, 2025 6:57 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नागपूर/
Ashadhi Wari 2025: आली आषाढी वारी, रेल्वे नेणार पंढरीच्या दारी! भाविकांसाठी 80 गाड्या, वेळापत्रक