अविनाश सगर मानसिक ताणतणावाखाली
घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेतली आणि हल्ला करणाऱ्या अविनाश सगरला ताब्यात घेतलं आहे. अपर पोलीस अधीक्षक गणेश बिरादार यांनी दिलेल्या माहितीनुसार, हल्ला करणारा अविनाश सगर मानसिक ताणतणावाखाली असून तो 'मेंटली डिस्टर्ब' (मानसिकदृष्ट्या अस्वस्थ) असल्याचे समोर आले आहे. त्याच्यावर सध्या वैद्यकीय महाविद्यालयात उपचार सुरू आहेत.
advertisement
खचाखच भरलेल्या बसमध्ये जीवघेणा हल्ला
मिळालेल्या माहितीनुसार, ज्या बसमध्ये हा हल्ला झाला, ती बस इंदापूर आगाराची होती. घटनेच्या वेळी शुक्रवारी सकाळी ही बस बारामतीवरून इंदापूरच्या दिशेनं जात होती. ही बस काटेवाडी परिसरात आली असता, एका तरुणाने बाजुला बसलेल्या एका तरुणावर अचानक कोयत्याने वार केले आहे. प्रवाशांनी खचाखच भरलेल्या बसमध्ये अशाप्रकारे जीवघेणा हल्ला झाल्याने बसमध्ये एकच गोंधळ उडाला.
दरम्यान, ज्या तरुणावर हल्ला झाला होता, तो तरुण काटेवाडीमध्ये उतरून जखमी अवस्थेत घटनास्थळावरून निघून गेला आहे. ज्याच्यावर हल्ला झाला तो तरुण नेमका कोण आहे? याचा तपासही पोलीस करत आहेत.