सोलापूर : खिल्लार गायींच्या गोमुत्रातून सोलापुरात भाऊ बहीण लाखो रुपयांची उलाढाल करत आहेत. त्यांची ही कहाणी सर्वांसाठीच प्रेरणादायी आहे. याबाबत लोकल18 च्या टीमने घेतलेला हा विशेष आढावा.
दक्षिण सोलापूर तालुक्यातील वडकबाळ येथील प्रा. उमा बिराजदार आणि रुद्रप्पा बिराजदार या भावंडांनी आध्यात्मिक प्रेरणा घेतली आणि त्यातून गोशाळा उभारली. या गोशाळेत त्यांनी बचत गटाच्या 250 ते 300 महिलांना रोजगारदेखील उपलब्ध करुन दिला आहे. यासोबतच या दोन्ही बहीण भावांनी स्वतःच्या शेतात गोसेवा सुरू केली आहे.
advertisement
गायीच्या गोमुत्रला किती महत्त्व आहे, याविषयी उलटसुलट चर्चा नेहमीच होत असते. कित्येकांना ते पटते तर अनेकांना त्यात तथ्य आहे, असे वाटत नाही. मात्र, गायीच्या उपयुक्ततेबद्दल शंका घेण्याचे कारण नाही, हे सोलापूरच्या प्रा. उमा बिराजदार यांनी आपल्या कटव्वादेवी गोशाळेत सिद्ध केले आहे.
एक गाव एक वाण, एकरी 60 क्विंटल उत्पादन, शेतकरी मालामाल, हे आहे राज्यातील मक्याचे गाव, VIDEO
दररोज सकाळी सूर्योदयापूर्वी गोमूत्र गोळा केले जाते. माणसाच्या आरोग्याच्या दृष्टीकोनातून, शेतीच्या दृष्टीकोनातून देशी खिल्लार गाईच्या गोमुत्राचे फार महत्त्व आहे. तसेच पूजा पाठसाठीसुद्धा गोमूत्राचा वापर केला जातो. होम-हवन, पूजा करायची असेल तर गोमूत्र वापरले जाते. तसेच एखाद्याचे निधन झाले असेत तर सुतक काढण्यासाठी गोमूत्र लागते.
प्रा. उमा बिराजदार यांच्या कटव्वादेवी गोशाळेत द्राक्ष बागायतदार, आंब्याचे बागायतदार तसेच इतर पीक व पालेभाज्या, फळभाज्या घेतलेले शेतकरी येतात आणि गोमूत्र घेऊन जातात. पिकावर जो रोग आलेला असतो तो रोग हटविण्याचे काम हे गोमूत्र करते, असेही त्यांनी सांगितले. त्यामुळे सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांकडून गोमूत्राला चांगली मागणी आहे.
घरची परिस्थिती हालाखीची, पण तरुणाने करुन दाखवलं, कंपनीमध्ये काम करून बनला पोलीस!
सध्या शेतीसाठी लागणारे गोमूत्र 30 रुपये लीटर या दराने विक्री केली जाते. शेटकरी थेट गोशाळेत येऊन गोमूत्र खरेदी करतात. तसेच गोमुत्रापासून गोनाईन हे थ्रीइन वन रसायन असून मच्छराचा नायनाट, फरशी पुसणे आणि रुम फ्रेशनर म्हणून काम करते. या उत्पादनांना चांगली मागणी आहे. महिला बचतगटाच्या महिलांना रोजगारही मिळत आहे.
गायीपासुन तयार केलेल्या सर्व वस्तूंची वर्षाखेरपर्यंत 3 ते 4 लाखांची उलाढाल होत आहे. तसेच लोकांमध्ये जनजागृती होत आहे. शेतकरी गो आधारित शेतीचे महत्व जाणून घेत आहेत. खिलारीसारख्या गोवंशाचे संवर्धन होत आहे, अशी माहिती प्रा. उमा बिराजदार यांनी लोकल18 शी बोलताना दिली.