दुहेरीकरणामुळे या गाड्या रद्द
दौंड - मनमाड विभागातील दौंड - काष्टी स्थानकादरम्यान दुहेरी करण्यासाठी या कालावधीत 4 जानेवारी ते 26 जानेवारी 2026 पर्यंत महत्त्वाच्या रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.
गाडी क्रमांक 01461 - सोलापूर - दौंड डेमू स्पेशल व गाडी क्रमांक 01462 - दौंड डेमू स्पेशल - सोलापूर ही गाडी 4 जानेवारी ते 25 जानेवारीपर्यंत रद्द करण्यात आली आहे.
advertisement
गाडी क्रमांक 12169 पुणे - सोलापूर इंटरसिटी एक्सप्रेस व गाडी क्रमांक 12170 सोलापूर - पुणे इंटरसिटी एक्सप्रेस 15 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 12157 पुणे - सोलापूर हुतात्मा एक्सप्रेस व गाडी क्रमांक 12158 सोलापूर - पुणे हुतात्मा एक्सप्रेस 24 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 01487 पुणे - हरंगुळ स्पेशल व गाडी क्रमांक 01488 हरंगुळ - पुणे स्पेशल 24 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 11421 हडपसर - सोलापूर डेमू व गाडी क्रमांक 11422 सोलापूर - हडपसर डेमू 24 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 14613 पनवेल - नांदेड एक्सप्रेस व गाडी क्रमांक 17614 नांदेड - पनवेल एक्सप्रेस 24 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 01422 कलबुर्गी - दौंड स्पेशल व गाडी क्रमांक 01425 दौंड - कलबुर्गी स्पेशल 24 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
गाडी क्रमांक 11413 निजामाबाद - पंढरपूर एक्सप्रेस व गाडी क्रमांक 11414 पंढरपूर निजामाबाद एक्सप्रेस 24 जानेवारी ते 25 जानेवारी पर्यंत रद्द करण्यात आली आहे.
Samruddhi Mahamarg: समृद्धी महामार्गावर 5 दिवसांचा वाहतूक ब्लॉक, कधी आणि कुठं? पाहा सविस्तर
या गाड्यांचे मार्ग बदलले
गाडी क्रमांक 16332 तिरुवनंतपुरम - सीएसटी मुंबई एक्सप्रेस 24 जानेवारी 2026 पासून कुर्डूवाडी मिरज- पुणे मार्गे वळवली जाणार आहे. तर गाडी क्रमांक 11302 केएसआर बंगळूर - सीएसएमटी मुंबई उद्यान एक्सप्रेस 24 जानेवारीपासून कुर्डूवाडी-मिरज-पुणे मार्गे वळवली जाणार आहे. तसेच गाडी क्रमांक 20657 हुबळी हजरत निजामुद्दीन एक्सप्रेस 23 जानेवारीपासून सोलापूर - कुर्डुवाडी - लातूर - परळी - वैजनाथ - परभणी - छत्रपती संभाजीनगर - मनमाड मार्गे वळवण्यात येणार आहे.
या गाड्या रिशेड्युल
गाडी क्रमांक 12628 नवी दिल्ली - केएसआर बेंगळूर कर्नाटक एक्सप्रेस 23 जानेवारी रोजी 1 तास 40 मिनिटांसाठी नियंत्रित केली जाणार आहे. प्रवाशांनी प्रवास करत असताना आपल्या प्रवासाचे नियोजन करून प्रवास करावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.






