मुंबई - हैदराबाद विशेष गाडी
मुंबई - हैदराबाददरम्यान विशेष गाडी धावणार आहे. गाडी क्रमांक 07458 ही 28 डिसेंबर 2025 रोजी हैदराबाद येथून सायंकाळी 05 वाजून 30 मिनिटाला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10 वाजून 40 मिनिटाला एलटीटी (लोकमान्य टिळक टर्मिनस) मुंबई येथे पोहोचेल.
Mumbai Local: मुंबईकर रविवारी खोळंबा होणार, मध्य रेल्वेवर मेगाब्लॉक, कसं असेल वेळापत्रक?
advertisement
गाडी क्रमांक 07459 लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई - हैदराबाद नवीन वर्षाची विशेष गाडी 29 डिसेंबर 2025 सोमवार रोजी एलटीटी (लोकमान्य टिळक टर्मिनस) मुंबई येथून दुपारी 03 वाजून 20 मिनिटाला सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 9 वाजता हैदराबाद येथे पोहोचेल. तर या विशेष गाडीला बेगमपेट, लिंगमपल्ली, विकाराबाद, तांडूर, वाडी, कलबुर्गी, सोलापूर, पुणे आणि कल्याण येथे थांबे मिळणार आहे.

डब्याची संरचना
1 फर्स्ट एसी कम एसी -II टायर, 2 एसी -II टायर, 5 एसी -III टायर, 10 स्लीपर क्लास, 2 सेकंड क्लास आणि 2 लगेज कम ब्रेक व्हॅन असे एकूण 22 डबे असणार आहेत. प्रवाशांनी गाड्यांचा तपशील पाहून वैध तिकिटासह प्रवास करून प्रवासाचा आनंद घ्यावा, असे आवाहन रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आले आहे.