सोलापूर : यश मिळवणे योगायोगाचा खेळ नाही. कोणत्याही व्यवसायाला यशाच्या शिखरावर नेणे, जगातील सर्वात काठीण काम असते. पण यशस्वी व्यावसायिक आपल्या कलेच्या जोरावर यशाची पुनरावृत्ती करू शकतो. आज आपण अशाच एका व्यक्तीचा प्रवास जाणून घेणार आहोत, जे असेच एक व्यावसायिक आहे, ज्यांनी एका सर्वसामान्य परिवारात असतानाही डिस्ट्रीब्यूटर स्तरावर झेप घेतली.
advertisement
आयुष्यात अनेक अडथळे येत राहिले पण त्यांनी हार मानली नाही. सचिन अशोक कुलकर्णी (रा. बलिदान चौक) असे या व्यक्तीचे नाव आहे. ते पद्मा डिस्ट्रीब्यूटरचे मालक आहेत. हालाखीच्या परिस्थितीवर मात करत सचिन कुलकर्णी यांनी सुरू केलेल्या व्यवसायाचा आज वटवृक्ष निर्माण केला आहे.
सचिन कुलकर्णी बीएस्सीचे शिक्षण घेत असताना त्यांच्या घरची परिस्थिती हालाखीची होती. त्यांचे वडील सिमेंट गोडाऊनमध्ये गोडाऊन किपर कामाला होते. सिमेंटच्या धुळीमुळे सचिन यांच्या वडिलांना खूप त्रास होत होता. घरची जबाबदारी अंगावर घेत बीएस्सीचा निकाल लागण्या अगोदरपर्यंत सचिन नोकरीच्या शोधात होते.
बीएस्सीचे शिक्षण घेतल्यामुळे मेडिकल फील्डशी संबंधित त्यांना आवड होती. नोकरीच्या शोधात असताना त्यांना एका हॉटेलमध्ये मेडिकल रेप्रेझेंटेटिव्ह पदाकरिता मुलाखत घेतल असल्याची माहिती मिळाली. दोन-तीन मित्रांसोबत सचिन हे मुलाखत देण्यासाठी त्याठिकाणी गेले.
वय 75, पण आज्जी करते चायनीज भेळचा व्यवसाय; नवी मुंबईतील याठिकाणी खवय्यांना मिळतेय उत्कृष्ट चव
2-3 वेळा मुलाखत घेतल्यानंतर त्यांची निवड झाली. मिळालेली नोकरी आता सोडायची नाही आणि पुढे शिक्षण करायचं म्हणलं तर परिस्थिती नव्हती आणि कुटुंबाची जबाबदारी देखील होती. त्यामुळे त्यांनी नोकरी करण्याचा निर्णय घेतला. 2002 मध्ये सचिन जेव्हा कामाला लागले होते तेव्हा त्यांना महिन्या 2200 रुपये पगार मिळत होता. हळूहळू पैसे जमा करत करत एका लेव्हला ते सेटल झाले.
MPSC मध्ये फेल बिझनेसमध्ये सक्सेस! 18 महिन्यात फेडलं बापाचं 12 लाखांचं कर्ज; कोणीही करेल हा व्यवसाय
यानंतर 2022 साली सचिन यांनी पद्मा डिस्ट्रीब्यूटर आयुर्वेदिक औषधी विक्रीचा फर्म चालवण्यासाठी घेतला. सचिन आणि त्यांचा लहान भाऊ यांनी हा फर्म दोघेजण चालवत होते. लहान भावाला एका दुसऱ्या ठिकाणी नोकरी मिळाल्यानंतर या फर्मची संपूर्ण जबाबदारी सचिन यांच्यावर आली. नोकरीच्या शोधात असणारे सचिन यांच्या पद्मा डिस्ट्रीब्यूटर या फर्ममध्ये आज दहा जण कम करत आहे.
पद्मा डिस्ट्रीब्यूटर येथील आयुर्वेदिक औषधे आणि आयुर्वेदिक प्रॉडक्ट सोलापूर जिल्हासह धाराशिव, लातूर, कर्नाटक आणि विजापूर आदी जिल्ह्यात जास्त प्रमाणात विक्रीस नेली जात आहे. आयुर्वेदिक औषधी विक्री करण्यास मदत पद्मा डिस्ट्रीब्यूटर अग्रेसर आहे. महिना अखेर पर्यंत 15 ते 20 लाख रुपये पर्यंतची आज उलाढाल पद्मा डिस्ट्रीब्यूटर करत आहे. त्यांच्या हा संघर्ष हा इतरांसाठी नक्कीच प्रेरणादायी आहे.