मिरज - लातूर अनारक्षित विशेष गाडी
गाडी क्रमांक 01443 मिरज - लातूर अनारक्षित विशेष गाडी 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी 7 वाजता मिरज येथून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी 3 वाजून 30 मिनिटांनी लातूर येथे पोहोचेल. या गाडीच्या एकूण 6 फेऱ्या होणार आहेत तर पंढरपूर येथे 10:15 मिनिटांनी आगमन होईल व प्रस्थान सकाळी 10:20 वाजता होईल.
advertisement
उलट दिशेने जाणाऱ्या लातूर - मिरज अनारक्षित गाडी क्रमांक 01444 ही विशेष गाडी 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत दररोज दुपारी 4 वाजता लातूरहून निघेल आणि त्याच दिवशी रात्री 11:45 मिनिटांनी मिरजला पोहोचेल. या गाडीच्या देखील एकूण 6 फेऱ्या होणार असून पंढरपूरला सकाळी 07:45 वाजता या गाडीचे आगमन होईल व सकाळी 07:50 वाजता प्रस्थान होईल.
Central Railway: सणासुदीत प्रवाशांची काळजी, मध्य रेल्वेचा मोठा निर्णय, लाखो प्रवाशांना फायदा!
मिरज - लातूर अनारक्षित विशेष गाडी क्रमांक 01441 दिनांक 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबर या कालावधीत दररोज रात्री 10 वाजता मिरजहून सुटेल आणि लातूरला दुसऱ्या दिवशी पहाटे 05:30 मिनिटांनी पोहोचणार असून या गाडीच्या देखील एकूण 6 फेऱ्या होणार आहेत. तर या गाडीचे आगमन पंढरपुरात रात्री 11:50 वाजता होईल व रात्री 11:55 वाजता प्रस्थान होईल.
थांबे कुठं?
या गाडीला अरग, सलगरे, कवठेमहांकाळ, ढालगाव, जत रोड, म्हसोबा डोंगरगाव, सांगोला, पंढरपूर, मोडनिंब, कुर्डुवाडी, शेंद्री, बार्शी टाऊन, पांगरी, धाराशिव, येडशी, कळंब रोड, ढोकी, मुरूड, औसा रोड, आणि हरंगुळ येथे थांबे देण्यात आले आहेत.
सोलापूर - मिरज अनारक्षित विशेष गाडी
गाडी क्रमांक 01419 सोलापूर - मिरज अनारक्षित विशेष गाडी 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत दररोज सकाळी 7 वाजता सोलापूरहून निघेल आणि त्याच दिवशी दुपारी 12:10 वाजता मिरजला पोहोचेल. सोलापूर- मिरज अनारक्षित विशेष गाडीच्या 6 फेऱ्या होणार असून ही गाडी पंढरपूरला सकाळी 09:20 वाजता येईल आणि 9.25 वाजता गाडीचे प्रस्थान होईल.
उलट दिशेने जाणारी गाडी क्रमांक 01420 मिरज - सोलापूर अनारक्षित विशेष ट्रेन 30 ऑक्टोबर ते 4 नोव्हेंबरपर्यंत दररोज दुपारी 12 वाजून 50 मिनिटांनी मिरजहून सुटेल आणि त्याच दिवशी संध्याकाळी 7 वाजता सोलापूरला पोहोचेल. या गाडीच्या देखील एकूण 6 फेऱ्या होणार असून पंढरपूरला या गाडीचे आगमन दुपारी 2 वाजून 50 मिनिटांनी होईल आणि प्रस्थान 02 वाजून 55 मिनिटांनी होईल.
थांबे कुठं?
या गाडीला मोहोळ, माढा, कुर्डुवाडी, मोडनिंब, पंढरपूर, सांगोला, म्हसोबा डोंगरगाव, जत रोड, ढालगाव, महांकाळ, सलगरे आणि अरग येथे थांबे देण्यात आले आहेत. पंढरपूरला कार्तिकी एकादशीनिमित्त येणाऱ्या भाविकांनी सदर विशेष गाड्यांचा वेळ लक्षात घेऊन आपला प्रवास निश्चित आणि सुरक्षित करावा, असे आवाहन सोलापूर रेल्वे विभागामार्फत करण्यात आले आहे.






