सोलापूर : गेल्या दोन दिवसात कांद्याच्या दरात अचानक वाढ झाली. सोलापूर जिल्ह्यात शेतकऱ्यांचा कांदा अद्याप शेतातच आहे. कांदा काढायला वेळ आहे. मात्र, पुण्याच्या जुन्या कांद्याला सोलापुरात चांगला भाव मिळत आहे. सोलापूर बाजार समितीत 5 हजार रुपयांचा दर मिळत आहे. त्यामुळे सोलापूरच्या बाजारात पुण्याच्या कांद्याचाच बोलबाला आहे. सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत कांद्याची आवक वर्षभर असते. याबाबत अधिक माहिती सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील कांदा व्यापारी सादिक बागवान यांनी अधिक माहिती दिली.
advertisement
लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, मागील वर्षभरात तब्बल 80 लाख क्विंटल कांद्याची आवक झाली. त्यामुळे सोलापुरात कांदा महाबँक उभारण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. सोलापूर बाजार समितीत सोलापूर जिल्ह्यासह, पुणे, अहमदनगर, विजयपूर, गुलबर्गा आदी जिल्ह्यांतून कांदा येतो. यंदा जिल्ह्यात झालेल्या समाधानकारक पावसामुळे कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात झालेली आहे.
दोनदा अपयश, पण शेवटी मैदान मारलंच!, 'ब्यूटी विथ ब्रेन' असलेल्या आयपीएस अधिकारी आशना चौधरी, PHOTOS
अनेक शेतकऱ्यांनी थेट कांद्याची पेरणीच केली आहे. त्यामुळे येणाऱ्या हंगामात कांद्याची आवक मोठी असण्याची शक्यता आहे. सध्या सोलापूर बाजार समितीत कांद्याची आवक कमी आहे. मुळात सोलापूर जिल्ह्यात कांदा मे किंवा जास्तीत जास्त जूनपर्यंत विकला जातो. त्यानंतर आपल्याकडील कांदा टिकत नाही. सध्या पुणे, अहमदनगर जिल्ह्यांतून कांद्याची आवक सुरू आहे.
सरासरी 100 ते 150 ट्रक कांदा आता पावसाळ्यात सुरू आहे. मागील दोन दिवसात अचानक दरात वाढ झाली आहे.
निर्यातबंदी उठवल्यानंतर कांद्याला सरासरी 5 हजारांपर्यंत दर मिळत होता. मात्र, मागील दोन दिवसात सोलापुरातील दर 5 हजारांपर्यंत पोहोचला आहे. सरासरी दरही 4 हजारांपर्यंत आहे. मात्र, या वाढलेला दराचा फायदा पुण्यातील शेतकऱ्यांना होणार आहे.