पिंपरी चिंचवडकरांसाठी धोक्याची घंटा, हवा झाली दूषित, धक्कादायक माहिती समोर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर

Last Updated:

शहरातील भोसरी, वाकडमधील भूमकर चौक, निगडी या भागातील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत नोंदवली गेली आहे. वर्षभरात 3 महिने शहरातील हवा वाईट श्रेणीत गेली आहे.

पिंपरी चिंचवडकरांसाठी धोक्याची घंटा, हवा झाली दूषित
पिंपरी चिंचवडकरांसाठी धोक्याची घंटा, हवा झाली दूषित
शिवानी धुमाळ, प्रतिनिधी
पुणे : पिंपरी-चिंचवड शहर हे औद्योगिक नागरी म्हणून उदयास आलेले शहर आहे. मात्र, आता या शहरातील हवा गेल्या अनेक करणामुळे अतिवाईट श्रेणीमध्ये गेली आहे. शहराची झपाट्याने वाढ होत आहे. अनेक वेगवेगळी बांधकामे तसेच वाहनांचा धूर, फटाके, एमआयडीसी कंपनीतील धूर या सर्व कारणांमुळे पिंपरी चिंचवडची हवा दूषित झाली आहे.
शहरातील भोसरी, वाकडमधील भूमकर चौक, निगडी या भागातील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीत नोंदवली गेली आहे. वर्षभरात 3 महिने शहरातील हवा वाईट श्रेणीत गेली आहे. तर 9 महिने समाधानकारक असल्याचे महापालिकेने केलेल्या पर्यावरण सस्थिती अहवालात म्हटले आहे. भारतीय हवामानशास्त्र (आयआयटीएम) संकेतस्थळाच्या उष्णकटिबंधीय संस्थेच्या 'सफर' माध्यमातून प्रदूषणाच्या नोंदी घेतल्या आहेत.
advertisement
अतिसूक्ष्म धूलिकण (पीएम 2.7) आणि सूक्ष्म धूलिकणात (पीएम 10) वाढ झाल्याने शहराच्या काही भागातील हवेची गुणवत्ता खराब श्रेणीपर्यंत पोहोचली होती. भोसरी, वाकडमधील भूमकर चौक, निगडी या भागातील हवेची गुणवत्ता सर्वांत खराब श्रेणीत नोंदवली गेली आहे.
advertisement
हवा दूषित झाल्याने पालिकेने उपाययोजना हाती घेतल्या होत्या. नोव्हेंबरमध्ये शहरातील सर्व बांधकामे 8 दिवस बंद ठेवली होती. वायू प्रदूषण रोखण्यासाठी महापालिकेच्या वतीने 32 प्रभागांमध्ये 16 वायू प्रदूषण नियंत्रण पथकांची नेमणूक करण्यात आली होती. यादरम्यान प्रदूषण नियंत्रण तरतुदीचे पालन न केल्याचे उघड झाल्याने दंड आकारला होता.
advertisement
पुणेकरांचा आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर -
पुण्यातील शिवाजीनगर, पाषाण, लोहगाव, कोथरूड, भूमकर चौक, भोसरी, निगडी, आळंदी या भागांतील हवेची गुणवत्ता ही सर्वाधिक खराब श्रेणीत नोंदवल्या गेली आहे. यामुळे आरोग्याच्या तक्रारी तसेच श्वासणाचे आजार वाढले आहे. हवेचा गुणवत्ता निर्देशांक ढासळल्याने पुणेकरांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. यामुळे आता प्रशासन नेमक्या कोणती पावले उचलते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.
मराठी बातम्या/पुणे/
पिंपरी चिंचवडकरांसाठी धोक्याची घंटा, हवा झाली दूषित, धक्कादायक माहिती समोर आल्याने नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न ऐरणीवर
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement