सोलापूर : सोलापूर शहरातील रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि धार्मिक स्थळं, इत्यादी ठिकाणी रस्त्याच्या कडेला असलेल्या बेघर, निराधार, मनोरुग्ण आणि भिक्षेकऱ्यांची सहसा कोणाला काळजी नसते. या व्यक्तीसुद्धा समाजाचा एक भाग आहेत, असा विचार करून त्यांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी फार कमी लोक पुढाकार घेतात. यापैकीच एक सोलापुरातील रमेश चंद मीन आहेत. रमेश चंद हे गेल्या 10 वर्षांपासून ज्यांचं कोणीच नाही अशा सर्वांच्या मदतीला धावून जातात.
advertisement
रमेश चंद मीन हे ते मूळचे राजस्थानचे रहिवासी असून सध्या सोलापूरच्या दमानी नगरात राहतात. सोलापुरातील डी.आर.एम ऑफिसमध्ये कार्यालयीन अधीक्षक पदावर कार्यरत आहे. यूट्यूबवरील एका व्हिडिओमधून त्यांना निराधार, बेघर, मनोरुग्ण आणि भिक्षेकऱ्यांची सेवा करण्याची प्रेरणा मिळाली आणि गेल्या 10 वर्षांपासून ते ज्यांचं कोणीच नाही अशा सर्वांच्या मदतीला धावून जातात.
पतीचं निधन झालं अन् देवाला दोष देत बसले, एका घटनेनं बदललं आयुष्य, आता करतायेत मोठं काम!
ते स्वखर्चातून रस्त्याच्या कडेला आसरा शोधणाऱ्या लोकांना पोटभर जेवण देतात, त्यांना आंघोळ घालणं, त्यांची दाढी करणं, वेळोवेळी आरोग्य तपासणी करणं, त्यांना चांगले नवीन कपडे देणं ही कामं रमेश मीन जबाबदारीनं पार पडतात. विशेष म्हणजे या समाजसेवेत त्यांना त्यांची पत्नी हेमा आणि मित्र मंगेश हे सहकार्य करतात.
रमेश चंद मीन सोलापुरातील अनाथ, बेघर, भिक्षेकरी आणि मनोरुग्णांचा आधार बनले आहेत. आतापर्यंत रमेश चंद मीन यांनी रस्त्यावर फिरणाऱ्या भिक्षेकरी, व्यक्तींना 200 हून अधिक जणांना स्वखर्चाने त्यांचा राहात असलेला ठिकाणाचा पत्ता शोधून त्यांना सुखरूप घरी पोहोचवले आहे. 'भीक नको, दया नको, हवी मायेची सद्भावना' हा विचार जिवंत ठेऊन रमेश चंद मीन हे बेघर, भिक्षेकरी आणि मनोरुग्णांची सेवा ते करत आहे.