TRENDING:

दीड हजार सदस्य, तब्बल 2000 किलो रांगोळी, सोलापुरात नंदीध्वज मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या पायघड्या

Last Updated:

भक्तिमय वातावरणात सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांची यात्रा संपन्न होत आहे. हिरेहब्बू वाडा ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत नंदीध्वज मिरवणूक मार्गावर तीन किलोमीटर पर्यंत रांगोळी काढण्यात आली आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
advertisement

सोलापूर : भक्तिमय वातावरणात सोलापूरचे ग्रामदैवत श्री शिवयोगी सिद्धरामेश्वर महाराज यांची यात्रा संपन्न होत आहे. हिरेहब्बू वाडा ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत नंदीध्वज मिरवणूक मार्गावर तीन किलोमीटर पर्यंत रांगोळी काढण्यात आली आहे. गेल्या 25 वर्षांपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची संस्कार भारती रांगोळी काढत आहे. या संदर्भात अधिक माहिती संस्कार भारती सचिव आनंद देशपांडे यांनी दिली आहे.

advertisement

दीड हजार सदस्यांचा रांगोळी कामासाठी सहभाग

गेल्या 25 वर्षांपासून संस्कार भारतीच्या वतीने हिरेहब्बू वाडा ते सिद्धेश्वर मंदिरापर्यंत जवळपास 3 किलोमीटर पर्यंत रांगोळी काढण्यात येते. सोलापूरसह कोल्हापूर, गुजरात, पुणे, तुळजापूर, कोल्हापूर या ठिकाणांहून रांगोळी काढण्यासाठी तरुण - तरुणी आले आहेत. दीड हजार सदस्यांनी या रांगोळी कामासाठी सहभाग घेतला होता.

दृष्ट लागते म्हणजे नेमकं काय होतं बरं? प्रेमानंद महाराजांनी दिलं अत्यंत सुंदर उत्तर

advertisement

वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न

या रांगोळीच्या माध्यमातून दरवर्षी वेगवेगळे सामाजिक संदेश देण्याचा प्रयत्न संस्कार भारतीच्या वतीने करण्यात येतो. स्वदेशी भारत, स्वावलंबी भारत, प्रयागराज येथील कुंभमेळ्याची थीम या रांगोळ्यांच्या माध्यमातून दिसून येत आहे. रांगोळ्यांची सुबकता साकारण्यासाठी तब्बल 2000 किलो रांगोळी तसेच 1000 किलो रंगाचा वापर संस्कार भारतीच्या वतीने सोलापुरात करण्यात आलेला आहे, असं संस्कार भारती सचिव आनंद देशपांडे यांनी सांगितलं.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आर्थिक स्थैर्य मिळणार,व्यवसायात नवीन संधी,महाशिवरात्रीला या 4 राशींवर कृपादृष्टी
सर्व पहा

आज ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज आणि कुंभार कन्या यांचा प्रतिकात्मक विवाह सोहळा संपन्न होणार आहे. या विवाह सोहळ्याला हिरे हब्बू वाड्यापासून नंदीध्वजाची मिरवणूक काढली जाते. ग्रामदैवत सिद्धेश्वर महाराज यांची यात्रा सोलापुरात साडे नऊशे वर्षांपासून साजरी केली जाते. तब्बल पाच दिवस ही महायात्रा चालते.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
दीड हजार सदस्य, तब्बल 2000 किलो रांगोळी, सोलापुरात नंदीध्वज मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या पायघड्या
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल