TRENDING:

पंढरपुरातल्या रिक्षाचालकाचं कौतुकास्पद कार्य; अपंग, गरोदर महिलांना देतोय मोफत रिक्षासेवा, VIDEO

Last Updated:

मागील 10 वर्षांपासून ते पंढरपुरात अंध, अपंग आणि गरोदर महिलांना मोफत रिक्षासेवा देत आहेत. मोफत रिक्षा सेवा देण्यासंबंधीचा बोर्डही त्यांनी रिक्षाच्या बाहेर लावला आहे. 

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इरफान पटेल, प्रतिनिधी
advertisement

सोलापूर : समाजात काही ठिकाणी अनेक लोकं हे आपण समाजाचं काहीच देणं लागत नाही, अशा प्रकारच्या आविर्भावात वावरतात. तर काही लोकं हे आपण समाजाचं देणं लागतो, या विचारानं वागतात आणि समाजाची सेवा करतात. आज अशाच एका व्यक्तीची कहाणी आपण जाणून घेणार आहोत, जे रिक्षाचालक आहेत आणि आपल्या रिक्षातून अपंग, गरोदर महिलांना मोफत प्रवास सेवा देत आहेत.

advertisement

विष्णू यशवंत शेटे असे या व्यक्तीचे नाव आहे. ते पंढरपूरमधील रहिवासी आहे. ते आपली सामाजिक बांधिलकी जपत अपंग, गरोदर महिलेला मोफत रिक्षा सेवा देत आहेत. मागील 10 वर्षांपासून ते पंढरपुरात अंध, अपंग आणि गरोदर महिलांना मोफत रिक्षासेवा देत आहेत. मोफत रिक्षा सेवा देण्यासंबंधीचा बोर्डही त्यांनी रिक्षाच्या बाहेर लावला आहे.

पोलीस भरतीसाठी शहरात आलेल्या विद्यार्थ्यांना झाली मोठी मदत, या तरुणानं केलं महत्त्वाचं कार्य

advertisement

रिक्षामध्ये आहेत आणखी याही सुविधा -

तसेच या रिक्षामध्ये फ्री वायफाय, टीव्ही स्क्रीन, पेपर नॅपकिन, रिक्षामध्ये बसणाऱ्या ग्राहकांना पिण्यासाठी फिल्टर पाण्याची सोय देखील करण्यात आली आहे. तसेच लहान मुलांना खाण्यासाठी चॉकलेटही उपलब्ध आहेत. आतापर्यंत 500 हून अधिक अपंगांना तसेच गरोदर महिलांना मोफत सेवा देण्याचे काम विष्णू शेटे यांनी केले आहे. तर रक्षाबंधन, रमजान ईदच्या दिवशीही ग्राहकांना मोफत रिक्षा सेवा देतात.अपंगांना तसेच गरोदर महिलांना स्वतःचा मोबाईल नंबर देऊन तुम्हाला कधी मदत लागली तर कॉल करा,असे आवाहनही त्यांनी केले आहे.

advertisement

मध्यंतरी पंढरपुरात छत्रपती संभाजी राजे आले असताना त्यांनी स्वतः ही रिक्षा चालविली आहे. तर सोलापूरच्या नवनिर्वाचित खासदार प्रणिती शिंदे यांनी या रिक्षात बसून प्रवास केला आहे. अपंगांना मोफत रिक्षा सेवा देणाऱ्या विष्णू शेटे यांचे बच्चू कडू यांनीही कौतुक केले आहे.

Vat Purnima 2024 : अनोखा आहे वटपौर्णिमेचा इतिहास, नेमकं काय आहे यामागची कहाणी, जाणून घ्या, विशेष महत्त्व

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

महागाईच्या काळात पेट्रोल, सीएनजीच्या किमती प्रचंड वाढल्या आहेत. मात्र, विष्णू शेटे सारखी माणसे या गोष्टींचा विचार न करता समाजाप्रती असणारी जाणीव लक्षात घेऊन माणूसकीच्या नात्याने अशी चांगली सेवा देण्याचे काम करत आहे. विष्णू यांच्यामुळे "खरा तो एकची धर्म जगाला प्रेम अर्पावे" या ओळीची प्रचिती येते.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
पंढरपुरातल्या रिक्षाचालकाचं कौतुकास्पद कार्य; अपंग, गरोदर महिलांना देतोय मोफत रिक्षासेवा, VIDEO
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल