Vat Purnima 2024 : अनोखा आहे वटपौर्णिमेचा इतिहास, नेमकं काय आहे यामागची कहाणी, जाणून घ्या, विशेष महत्त्व

Last Updated:

पौराणिक विद्या अभ्यासक सुरज सदानंद म्हशेळकर यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात.

+
वटपौर्णिमा

वटपौर्णिमा 2024

प्रियंका जगताप, प्रतिनिधी
मुंबई : वड हा अनेक वर्ष आयुष्य असणारा वृक्ष म्हणून ओळखला जातो. प्रामुख्‍याने महाराष्ट्रात वट पौर्णिमा मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते. ज्‍येष्‍ठ महिन्‍यात 21 जुन रोजी येणारी पौर्णिमा ही वट पौर्णिमा म्हणून साजरी केली जाणार आहे. त्यामुळे या वटपौर्णिमा साजरं करण्यामागचं कारण काय आहे किंवा या सणाचं महत्त्व काय, याबाबत जाणून घेऊयात.
advertisement
पौराणिक विद्या अभ्यासक सुरज सदानंद म्हशेळकर यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, हिंदू धर्मात वटपौर्णिमा हा सण महिला मोठ्या उत्साहाने साजरा करतात. ज्येष्ठ महिन्यात 21 जून 2024 रोजी येणारी पौर्णिमा हा दिवस वटपौर्णिमा म्हणून साजरा केला जाईल. आपल्या पतीला उत्तम आयुष्य आणि आरोग्य लाभण्यासाठी हे व्रत करण्यात येते. यात वडाच्या वृक्षाची पूजा केली जाते.
advertisement
वटसावित्रीची कहाणी काय -
या वटसावित्रीची पूजा करण्यामागची अशी पौराणिक कथा होती की, अनेक वर्षापूर्वी भद्र देशात अश्वपती नावाचा राजा राज्य करीत होता. त्याला सावित्री नावाची कन्या होती. सावित्री उपवर झाल्यावर राजाने तिलाच आपला पती निवडण्याची परवानगी दिली. सावित्रीने सत्यवान नावाच्या राजकुमाराची निवड केली. सत्यवान हा शाल्व राज्याचा धृमत्सेन नावाच्या अंध राजाचा मुलगा होता. शत्रूकडून हरल्यामुळे आपल्या राणी व मुलासहित राजा जंगलात राहत होता.
advertisement
तुमच्या राशीतील शनिग्रह होणार मजबूत, पण प्रत्येकाला हे रत्न सूट होत नाही, जाणून घ्या फायदे-तोटे
भगवान नारदाला सत्यवानाचे आयुष्य केवळ एक वर्षाचेच असल्याचे माहीत असल्याने त्यांनी त्याच्याशी लग्न करू नको असा सल्ला सावित्रीला दिला. पण सावित्रीने ते मान्य केले नाही आणि तिने सत्यवानाशी विवाह केला. दरम्यान, सत्यवानाचा मृत्यू जेव्हा तीन दिवसांवर येऊन ठेपला तेव्हा तिने तीन दिवस उपवास करून सावित्री व्रत आरंभिले. सत्यवान जंगलात लाकडे तोडण्यास निघाला असता सावित्री त्याच्याबरोबर गेली.
advertisement
लाकडे तोडता तोडता त्याला चक्कर आले आणि तो जमिनीवर पडला. यमधर्म तिथे आला व सत्यवानाचे प्राण नेऊ लागला. सावित्री यमाच्या मागे आपल्या पतीबरोबर जाऊ लागली. यमाने अनेक वेळा सावित्रीस परत जाण्यास सांगितले. पण तिने साफ नाकारले व पतीबरोबर जाण्याचा हट्ट धरला. अखेर कंटाळून यमाने पती सोडून तिला तीन वर मागण्यास सांगितले. सावित्रीने सासू-सासऱ्याचे डोळे व राज्य परत मागितले व आपल्याला पुत्र व्हावा असा वर मागितला.
advertisement
दररोज लावत आहात टिळा, तर या 4 गोष्टी कायम लक्षात ठेवा, अन्यथा दिवसभरातील पुण्य होणार नष्ट
यमराजाने गफलतीने तथास्तु म्हटले. तेव्हा त्याला वचनबद्ध झाल्याची आठवण झाली व सत्यवानाचे प्राण परत करावे लागले. सत्यवानाचे प्राण सावित्रीने वडाच्या झाडाखालीच परत मिळविले म्हणून ज्येष्ठ महिन्यात पौर्णिमेला स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करून उपवास करतात व वट सावित्री व्रत आचरतात. त्यामुळे आजतागायत संपूर्ण हिंदु धर्मात वटसावित्रीचा हा व्रत विवाहित महिला आपल्या पतीला चांगले आयुष्य लाभावे, यासाठी करतात.
advertisement
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
मराठी बातम्या/अध्यात्म/
Vat Purnima 2024 : अनोखा आहे वटपौर्णिमेचा इतिहास, नेमकं काय आहे यामागची कहाणी, जाणून घ्या, विशेष महत्त्व
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement