तुमच्या राशीतील शनिग्रह होणार मजबूत, पण प्रत्येकाला हे रत्न सूट होत नाही, जाणून घ्या फायदे-तोटे
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
ज्योतिष शास्त्रानुसार, निलम रत्न मकर आणि कुंभ राशीचे लोक धारण करू शकतात. या दोन्ही राशींवर शनीचे वर्चस्व आहे. जर शनिदेव कुंडलीत कमजोर आहेत तर निलम रत्न धारण करुन त्यांची शक्ती वाढवली जाऊ शकते. तसेच जर तुम्ही जर एखाद्या ज्योतिषीकडून सल्ला घेत असाल तर अपूर्ण सल्ला घेऊ नये अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
ईशा बिरोरिया, प्रतिनिधी
ऋषिकेश : प्रत्येक व्यक्तीच्या कुंडलीत कुठला ना कुठला ग्रह हा कमजोर किंवा अशुभ स्थितीमध्ये असतो. त्यामुळे अशावेळी ज्योतिष शास्त्रानुसार, अनेक प्रकारचे उपाय आणि रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो. दरम्यान, उत्तराखंडमध्ये असलेल्या ऋषिकेशमध्ये मोठ्या प्रमाणात रत्नांचा व्यापार केला जातो. त्याच पार्श्वभूमीवर लोकल18 च्या टीमने एक विशेष आढावा घेतला.
लोकल18 च्या टीमने याबाबत माहिती जाणून घेण्यासाठी ज्योतिषाचार्य प्रकाश चंद्र जोशी यांच्याशी संवाद साधला. यावेळी त्यांनी सांगितले की, ज्योतिष शास्त्रानुसार, निलम रत्न मकर आणि कुंभ राशीचे लोक धारण करू शकतात. या दोन्ही राशींवर शनीचे वर्चस्व आहे. जर शनिदेव कुंडलीत कमजोर आहेत तर निलम रत्न धारण करुन त्यांची शक्ती वाढवली जाऊ शकते. तसेच जर तुम्ही जर एखाद्या ज्योतिषीकडून सल्ला घेत असाल तर अपूर्ण सल्ला घेऊ नये अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते.
advertisement
पुढे ते म्हणाले की, निलमसोबत मूंगा, माणिक आणि मोती अजिबात घालू नये. अन्यथा तुमचे मोठे नुकसान होऊ शकते. कारण या रत्नांचा संबंध ज्या ग्रहांसोबत असतो, त्याच्यासोबत शनि देवाचा शत्रुत्वाचा भाव आहे. जेव्हा एखाद्या व्यक्तीच्या कुंडलीत शनि ग्रह कमजोर किंवा अशुभ स्थितीत असतो, त्यावेळी त्याला निलम रत्न धारण करण्याचा सल्ला दिला जातो.
advertisement
जन्मानंतरचे 28 दिवस नवजात बालकासाठी अत्यंत महत्त्वाचे, अशाप्रकारे घ्याल काळजी, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
हे एकमात्र असे रत्न आहे, ज्याचा प्रभाव तुम्हाला फक्त 24 तासांच्या आत पाहायला मिळतो. असे म्हटले जाते की, हे रत्न जर एखाद्याला सूट झाले तर त्याचे नशिबच खुलते. तसेच जर ते एखाद्याला सूट झाले नाही तर त्याच्या आयुष्यात अनेक भयानक घटना घडतात.
advertisement
निलम रत्न घालण्याचे फायदे आणि योग्य पद्धत -
ज्योतिषाचार्य प्रकाश चंद्र जोशी यांनी सांगितले की, झोप येत नसेल तर निलम रत्न वापरता येऊ शकते. निलम रत्न धारण केल्याने व्यक्ती धैर्यवान बनतो. त्याची थांबलेली कामे पूर्ण होऊ शकतात. हे रत्न घातल्याने व्यक्तिला मान-सम्मानासह प्रसिद्धीही मिळते. तसेच त्याच्या कामाच्या पद्धतीतही आणखी प्रगती होते. निलमला कमीत कमी 7 (180 मिलिग्रॅम) ते सव्वा 8 रत्तीचा घातला पाहिजे.
advertisement
पाण्यात मीठ टाकून अंघोळ करण्याचे खूपच फायदे, त्वचेच्या समस्या ते इम्यूनिटी अन् हाडेही होणार मजबूत
निलमला पंचधातू मध्ये टाकून अंगठी तयार करायला हवी. याला डाव्या हातात घालायला वे. निलमची अंगठी शनिवारी मध्यरात्री धारण करणे फायदेशीर मानले गेले आहे. तसेच ही अंगठी घालण्यापूर्वी अंगठीला गंगाजल आणि गायीच्या कच्च्या दूधाने शुद्ध करावे, असा महत्त्वाचा सल्लाही त्यांनी दिला.
advertisement
सूचना : ही माहिती राशि-धर्म आणि शास्त्रांच्या आधारावर ज्योतिषाचार्य आणि आचार्यांशी संवाद करुन लिहिली गेली आहे. ही माहिती सार्वजनिक आहे. हा वैयक्तिक सल्ला नाही. लोकल18 याबाबत कोणताही दावा करत नाही.
Location :
Rishikesh,Dehradun,Uttarakhand
First Published :
June 17, 2024 2:35 PM IST
मराठी बातम्या/राशीभविष्य/
तुमच्या राशीतील शनिग्रह होणार मजबूत, पण प्रत्येकाला हे रत्न सूट होत नाही, जाणून घ्या फायदे-तोटे