जन्मानंतरचे 28 दिवस नवजात बालकासाठी अत्यंत महत्त्वाचे, अशाप्रकारे घ्याल काळजी, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला
- Published by:Khushalkant Dusane
- local18
Last Updated:
त्या म्हणाल्या की, नवजात बालकासाठी पहिले 28 दिवस खूप महत्त्वाचे आहे. या कालावधी दरम्यान, त्याची विशेष काळजी घ्यायला हवी.
आकांक्षा दीक्षित, प्रतिनिधी
दिल्ली : बाळ जन्माला आल्यानंतर पहिले 28 दिवस त्याच्या आयुष्यासाठी अत्यंत कठीण असतात. त्यामुळे या दरम्यान, बाळाची विशेष काळजी घ्यायला हवी. ही वेळ खूपच नाजूक असते. अशावेळी बाळाला इन्फेक्शन आणि आजारांचा धोका कायम राहतो. त्यामुळे तुम्हीही जर नुकत्याच आई बनल्या असाल किंवा गर्भवती असाल तर नवजात बालकासाठी पहिले 28 दिवस हे किती महत्त्वाचे असतात, याबाबत चाइल्ड स्पेशलिस्ट यांच्याकडून जाणून घेऊयात.
advertisement
साउथ दिल्लीच्या NFC मध्ये स्थित माता मंदिर चॅरिटेबल हॉस्पिटल आहे. हे दिल्लीतील पहिल्या क्रमांकाच्या हॉस्पिटलपैकी एक आहे. येथील चाइल्ड स्पेशलिस्ट डॉक्टर वीना दुआ यांनी याबाबत माहिती दिली. लोकल18 शी बोलताना त्यांनी सांगितले की, त्यांनी आपले पदवीचे शिक्षण हे LLRM मेडिकल कॉलेज मेरठ येथून घेतले.
पाण्यात मीठ टाकून अंघोळ करण्याचे खूपच फायदे, त्वचेच्या समस्या ते इम्यूनिटी अन् हाडेही होणार मजबूत
यानंतर पदव्युत्तर पदवीचे शिक्षण हे कलावती हॉस्पिटल लेडी हार्डिंग मेडिकल कॉलेज दिल्लीतून पूर्ण केले. तसेच मागील 45 वर्षांपासून त्या लहान मुलांवर उपचार करत आहेत. त्या म्हणाल्या की, नवजात बालकासाठी पहिले 28 दिवस खूप महत्त्वाचे आहे. या कालावधी दरम्यान, त्याची विशेष काळजी घ्यायला हवी.
advertisement
- डिलिव्हरीनंतर पहिले दूध जे येते, ते पिवळे असते. त्याला काढून फेकू नये. कारण ते बाळासाठी खूप फायदेशीर असते आणि बाळ जन्माला आल्यानंतर अर्ध्या तासानंतरच त्याला दूध पाजायला हवे. आईने 6 महिन्यांपर्यंत बाळाला आपलेच दूध पाजायला हवे.
- जेव्हा बाळ जन्माला येते, तेव्हा त्याच्या स्किनवर एक लेयर असते त्याला हटवू नये. कारण ते बाळासाठी संरक्षक कवच सारखी असते. वेळेनुरुप आपोआप ती निघून जाते. कापूस आणि कापडाच्या मदतीने त्याला हटवू नये.
advertisement
- प्रयत्न करावा की, बाळ हे कमीत कमी लोकांच्या संपर्कात यावं. कारण बाळ खूप नाजूक असते. त्यामुळे लोकांच्या संपर्कात आल्यानंतर इन्फेक्शनचा धोका वाढतो.
- बाळाला त्याच्या जन्मानंतर हेपेटाइटिस बी, टीबी आणि पोलियोचा डोस दिला जातो. अवश्य हा डोस द्यावा. त्यानंतर 6 आठवड्यांनी पुन्हा हे लसीकरण केले जाते. हे लसीकरण चुकवू नये असा सल्लाही त्यांनी दिली.
advertisement
Location :
Delhi
First Published :
June 16, 2024 3:04 PM IST
मराठी बातम्या/हेल्थ/
जन्मानंतरचे 28 दिवस नवजात बालकासाठी अत्यंत महत्त्वाचे, अशाप्रकारे घ्याल काळजी, तज्ज्ञांनी दिला महत्त्वाचा सल्ला


