TRENDING:

कमानीवर झेंडा लावायला गेला अन् घात झाला, 24 वर्षीय तरुण जागेवरच संपला, सोलापूर हळहळलं!

Last Updated:

Solapur News: घरातील कर्ता तरुण अचानक निघून गेल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णालय परिसरात मित्र-नातेवाइकांची गर्दी झाली होती.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर - आनंदाच्या क्षणासाठी उभारलेल्या स्वागत कमानीनेच एका कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला. कुमठा नाका परिसरातील स्वागतनगर रोडवर बुधवारी सायंकाळी घडलेल्या अपघातात 24 वर्षीय तरुणाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला. केतन रमेश पाटोळे असे भारतनगर येथे राहणाऱ्या मृत तरुणाचे नाव आहे. या घटनेनंतर परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
Solapur News: मंडप उभारला, कमानीवर झेंडा लावणार तोच…, ‘ते’ दृश्य पाहून एकच आक्रोश, सोलापूर हळहळलं!
Solapur News: मंडप उभारला, कमानीवर झेंडा लावणार तोच…, ‘ते’ दृश्य पाहून एकच आक्रोश, सोलापूर हळहळलं!
advertisement

केतन पाटोळे हा अत्यंत मेहनती व सर्वांच्या मदतीला धावून जाणारा म्हणून ओळखला जात होता. गुरुवारी होणाऱ्या कार्यक्रमाच्या तयारीसाठी यशवंत सोसायटी, स्वागतनगर येथे मंडप उभारण्यात आला होता. त्याच मंडपासमोरील स्वागत कमानीवर झेंडा लावण्यासाठी केतन वर चढला होता.

बाशिंग बांधण्यापूर्वीच रिक्षाचालकाचा तलावात दुर्दैवी अंत; मित्रही बेपत्ता, सोलापुरातील घटना

झेंड्यासाठी वापरलेल्या कापडाला जोडलेला स्टीलचा पाइप आणि कमानीच्या अगदी शेजारी असलेली विद्युत तार यांचा संपर्क आला आणि क्षणार्धात सगळं संपलं. जोरदार विजेचा धक्का बसताच केतन सुमारे 20 फूट उंचीवरून खाली कोसळला. हा थरारक प्रसंग पाहून आजूबाजूचे तरुण हादरून गेले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
लिंबू उत्पादक शेतकऱ्यांसाठी गुड न्यूज, दरात झाली वाढ, केळीला काय मिळाला भाव?
सर्व पहा

सोबत असलेल्या मित्राने तत्काळ आरडाओरडा करत मदतीसाठी धाव घेतली. उमेश पाटोळे यांनी केतनला तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल केले; मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले. घरातील कर्ता तरुण अचानक निघून गेल्याने आईवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. रुग्णालय परिसरात मित्र-नातेवाइकांची झालेली गर्दी आणि त्यांच्या डोळ्यातील अश्रू हीच या घटनेची तीव्रता सांगून जात होती.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
कमानीवर झेंडा लावायला गेला अन् घात झाला, 24 वर्षीय तरुण जागेवरच संपला, सोलापूर हळहळलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल