TRENDING:

इफ्तार झाला अन् चहासाठी बाहेर पडले, पण तो कप ठरला शेवटचा, जिवलग मित्रांसोबत भयंकर घडलं, सोलापूर हळहळलं!

Last Updated:

Solapur News: शुक्रवारी रोजा इफ्तार केल्यानंतर ते कार घेऊन पुणे रोडवरील लांबोटी येथे चहा पिण्यासाठी गेले होते.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर: भरधाव कारने कंटेनरला मागून धडक दिल्याने सोलापुरातील विजापूर रोड परिसरात भीषण अपघात झाला. यामध्ये दोघा मित्रांचा दुर्दैवी मृत्यू झाला.  इमामउद्दीन झियाउल्ला बागवान (वय 19) आणि अमान निसार बागवान (वय 20, दोघे राहणार रंगराज नगर, हैदराबाद रोड, सोलापूर) अशी मृतांची नावे आहेत. इफ्तारनंतर कार घेऊन फेरफटका मारण्यासाठी आणि चहा घेण्यासाठी ते बाहेर पडले होते. या घटनेनंतर शहरात हळहळ व्यक्त होतेय.
Solapur News: इफ्तार झाला अन् चहासाठी बाहेर पडले, जिवलग मित्रांसोबत भयंकर घडलं, सोलपूर हळहळलं!
Solapur News: इफ्तार झाला अन् चहासाठी बाहेर पडले, जिवलग मित्रांसोबत भयंकर घडलं, सोलपूर हळहळलं!
advertisement

मिळालेल्या माहितीनुसार, इमामउद्दीन हा मूळचा तेलंगणाचा तर अमान हा सातारा जिल्ह्यातील होता. शिक्षण व कामानिमित्त दोघेही सोलापुरातील रंगराज नगर येथे वास्तव्यास होते. दोघांमध्ये जिवलग मैत्री होती. शुक्रवारी रोजा इफ्तार केल्यानंतर ते कार (एमएच 13 EK 7609) घेऊन पुणे रोडवरील लांबोटी येथे चहा पिण्यासाठी गेले होते. चहा घेतल्यानंतर थोडा वेळ फिरण्यासाठी ते पुणे-विजापूर बायपास मार्गाने विजापूर रोडच्या दिशेने निघाले.

advertisement

मित्रांनी आरडाओरडा केला, पण बघता बघता चिमुकला यश दिसेनासा झाला, सोलापुरात भयंकर घडलं

भरधाव वेगाने जात असताना त्यांच्या कारने समोरून जाणाऱ्या टेम्पोला पाठीमागून जोरदार धडक दिली. अपघाताची भीषणता एवढी होती की कारच्या पुढील भागाचा चक्काचूर झाला. पुढील सीटवर बसलेले दोघे मित्र गंभीर जखमी झाले. स्थानिकांच्या मदतीने त्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले; परंतु डॉक्टरांनी उपचारापूर्वीच त्यांना मृत घोषित केले.

advertisement

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
केळी दर घसरलेलेच, लिंबू आणि कांद्याला काय मिळाला भाव, एका क्लिकवर चेक करा
सर्व पहा

घटनेची माहिती मिळताच मित्र आणि नातेवाईकांनी शासकीय रुग्णालयात मोठी गर्दी केली होती. अचानक झालेल्या या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात शोककळा पसरली आहे. या प्रकरणाची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत या अपघाताची नोंद करण्यात आली असून अधिक तपास पोलीस करत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
इफ्तार झाला अन् चहासाठी बाहेर पडले, पण तो कप ठरला शेवटचा, जिवलग मित्रांसोबत भयंकर घडलं, सोलापूर हळहळलं!
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल