TRENDING:

एका दिवसाचं बाळ रडत होतं, नर्सनं पाहिलं अन् धक्काच बसला, सोलापुरात खळबळ

Last Updated:

Solapur News: कर्मचाऱ्यांनी संपूर्ण रुग्णालय परिसर पिंजून काढला, पण त्या निर्दयी माता-पित्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर - ज्या मातेच्या कुशीत बाळ सुरक्षित असतं आणि ज्या पित्याच्या खांद्यावर भविष्याची स्वप्नं फुलतात, त्याच माता-पित्याने आपल्या रडणाऱ्या चिमुकल्याला अनाथ करून पळ काढला. मन सुन्न करणारी ही घटना सोलापूरच्या श्री छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) घडली आहे. पोटच्या गोळ्याला अशा प्रकारे रुग्णालयाच्या खाटेवर सोडून जाताना त्या माऊलीचं काळीज कसं फाटलं नसेल? हा प्रश्न आता सर्वांना सतावत आहे.
Solapur News: एका दिवसाचं बाळ रडत होतं, नर्सनं पाहिलं अन् धक्काच बसला, सोलापुरात खळबळ
Solapur News: एका दिवसाचं बाळ रडत होतं, नर्सनं पाहिलं अन् धक्काच बसला, सोलापुरात खळबळ
advertisement

कर्नाटक राज्यातील बिदर जिल्ह्यातील हुमनाबाद येथील दुर्गा नागेश राऊळे आणि नागेश राऊळे हे दाम्पत्य प्रसूतीसाठी सोलापूरच्या शासकीय रुग्णालयात दाखल झाले होते. 20 फेब्रुवारी 2026 रोजी दुर्गाने एका गोंडस मुलाला जन्म दिला. वॉर्डमध्ये आनंदाचं वातावरण असायला हवं होतं, पण नियतीच्या मनात काहीतरी वेगळंच होतं.

मित्रांनी आरडाओरडा केला, पण बघता बघता चिमुकला यश दिसेनासा झाला, सोलापुरात भयंकर घडलं

advertisement

21 फेब्रुवारीच्या त्या दुर्दैवी दिवशी, अवघ्या काही तासांच्या आपल्या बाळाला रुग्णालयात असुरक्षित अवस्थेत सोडून हे आई-वडील कोणालाही काहीही न सांगता तिथून पसार झाले. काही वेळानंतर जेव्हा त्या चिमुकल्याचा रडण्याचा आवाज वॉर्डमध्ये घुमला, तेव्हा तिथल्या परिचारिका आणि कर्मचाऱ्यांचे लक्ष त्या खाटेकडे गेले. जवळ आई नाही की वडील, केवळ ते बाळ भुकेने आणि आधारासाठी टाहो फोडत होते.

advertisement

कर्मचाऱ्यांनी संपूर्ण रुग्णालय परिसर पिंजून काढला, पण त्या निर्दयी माता-पित्याचा कुठेही थांगपत्ता लागला नाही. या धक्कादायक प्रकारानंतर प्रसूतीशास्त्र विभागातील डॉ. स्वाती भोसले यांनी पोलीस ठाणे गाठले. त्यांच्या फिर्यादीवरून 13 मार्च रोजी सदर बझार पोलीस ठाण्यात दुर्गा राऊळे आणि नागेश राऊळे या दाम्पत्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
दोनदा अपयश पण जिद्द नाही सोडली, पुण्याच्या आर्याने कंपनी सेक्रेटरी परीक्षेत मिळवलं यश, Video
सर्व पहा

दरम्यान, नवजात बाळाला संगोपनासाठी पंढरपूर येथे पाठवण्यात आले असून दोघांचा शोध सुरू आहे. घटनेचा अधिक तपास हवालदार राहुल मनोहर हे करत आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
एका दिवसाचं बाळ रडत होतं, नर्सनं पाहिलं अन् धक्काच बसला, सोलापुरात खळबळ
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल