TRENDING:

Solapur News : रुग्णांसाठी रिक्षा, स्मशानभूमीत येणाऱ्यांना मोफत पाण्याची सेवा, सोलापुरातील रिक्षा चालकाचा 3 वर्षांपासून उपक्रम, Video

Last Updated:

हा उपक्रम मोदी येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये गेल्या 3 वर्षांपासून तो राबवत आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना तो मोफत थंड पाणी पिण्यासाठी देत आहे.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
सोलापूर : आजच्या काळात अनेक रिक्षावाले रिक्षा चालवताना वेगवेगळे सामाजिक उपक्रम राबविताना पाहिला मिळतात. असाच रिक्षा चालक सोलापुरात असून स्मशानभूमीमध्ये अंत्यविधीसाठी येणाऱ्या लोकांची तहान भागवण्याचे पुण्याचे काम हा रिक्षा चालक करत आहे. हा उपक्रम मोदी येथील हिंदू स्मशानभूमीमध्ये गेल्या 3 वर्षांपासून तो राबवत आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांना तो मोफत थंड पाणी पिण्यासाठी देत आहे.
advertisement

नंदकुमार परदेशी असे या रिक्षा चालकाचे नाव आहे. नंदकुमार परदेशी हे सोलापूर शहरात गेल्या 3 वर्षांपासून रिक्षा चालक म्हणून काम करत आहेत. सोलापूरचा उन्हाळा पाहता नागरिकांना स्मशानभूमीत पिण्याच्या पाण्याची कमतरता भासू नये. म्हणून गेल्या 3 वर्षांपासून रिक्षा चालक नंदकुमार हे स्मशानभूमीत येणाऱ्या नागरिकांना पिण्यासाठी मोफत पाण्याची सेवा देत आहेत.

advertisement

'या' ठिकाणी चुकूनही लावू नका पूर्वजांचे फोटो, देवघर अन् बेडरूमध्ये फोटो लावणं कितीपत योग्य?

तसेच दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक आणि रुग्णांना रिक्षाचालक नंदकुमार परदेशी हे मोफत रिक्षा सेवा देत आहेत. एवढेच नव्हे तर रिक्षात पाठीमागच्या बाजूला पाण्याची व्यवस्था करून रस्त्याच्या कडेला बसलेल्या भिक्षुकांबरोबरच अंत्यसंस्कारासाठी आलेल्या लोकांची तहान भागवण्याचा प्रामाणिक प्रयत्न रिक्षावाला नंदू मागील 3 वर्षांपासून अहोरात्र करत आहेत.

advertisement

नंदकुमार परदेशी यांचे प्राथमिक शिक्षण सोनामाता प्रशाला आणि कॅम्प शाळेत पूर्ण झाले. त्यानंतर अकरावी आणि बारावीचे शिक्षण त्यांनी संगमेश्वर महाविद्यालयातून पूर्ण केले. नोकरीच्या मागे न लागता त्यांनी रिक्षा चालवण्याचा निर्णय घेतला. जवळचे चार पैसे आणि मित्रांकडून हातउसने पैसे घेऊन त्यांनी रिक्षा विकत घेतली. नवी रिक्षा घेतली अन् सोलापूरच्या रस्त्यावर सेवादूत म्हणून धावू लागली. मुली वाचवा... देश वाचवा... पर्यावरणाचे संवर्धन करा, गरिबांची मदत करा, महिलांच्या सुरक्षेला प्राधान्य द्या अशा विविध पातळीवरही नंदू परदेशी अहोरात्र काम करत आहेत.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News : रुग्णांसाठी रिक्षा, स्मशानभूमीत येणाऱ्यांना मोफत पाण्याची सेवा, सोलापुरातील रिक्षा चालकाचा 3 वर्षांपासून उपक्रम, Video
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल