'या' ठिकाणी चुकूनही लावू नका पूर्वजांचे फोटो, देवघर अन् बेडरूमध्ये फोटो लावणं कितीपत योग्य?
- Published by:Arjun Nalavade
- local18
Last Updated:
भारतीय संस्कृतीत पूर्वजांना आदराने स्मरण करणे हे एक संस्काराचे लक्षण मानले जाते. घरात त्यांच्या फोटोंची मांडणी करताना वास्तुशास्त्राचा विचार करणं गरजेचं आहे. ज्योतिषाचार्य अखिलेश पांडे यांच्या मते...
भारतीय संस्कृतीत आपल्या पूर्वजांचं स्थान खूप महत्त्वाचं आहे. त्यांचा आदर करणं आणि त्यांना आठवणं हे आपल्या संस्कारांचा भाग आहे. घरात पूर्वजांचे फोटो लावणं ही आता एक सामान्य गोष्ट झाली आहे. हे फोटो केवळ आपल्या भावनांचं प्रतीक नाहीत, तर ते आपल्याला कुटुंबातील मूल्यं आणि परंपरांची आठवण करून देतात. पण प्रश्न हा आहे की, हे फोटो घरात कुठे लावावेत? ते देवघरात लावणं योग्य आहे की बेडरूममध्ये? की दुसरी कोणतीतरी जागा यासाठी जास्त चांगली राहील?
ज्योतिषाचार्यांनी दिली माहिती
उत्तराखंडमधील ऋषिकेश येथे असलेल्या ग्रहस्थानम् ज्योतिष संस्थेचे ज्योतिषाचार्य अखिलेश पांडे यांनी 'लोकल 18' सोबत बोलताना सांगितलं की, पूर्वजांचे फोटो लावणं हे फक्त सजावटीचं साधन नाही, तर ते आदर, स्मरण आणि सन्मानाचं प्रतीक आहे. पण ते घरात योग्य ठिकाणी लावणं खूप महत्त्वाचं आहे. अनेक लोक आपल्या पूर्वजांना देवांसारखं मानतात आणि त्यांचे फोटो देवघरात लावतात. त्यांची ही भावना समजू शकते. पण वास्तुशास्त्रानुसार, देवघरात फक्त देवी-देवतांच्या मूर्ती आणि फोटोच ठेवावेत. देवघरात पूर्वजांचे फोटो लावल्याने ऊर्जेचा समतोल बिघडू शकतो. कारण देवघर हे शुद्ध आणि सकारात्मक ऊर्जेचं स्थान आहे. तर पूर्वजांचे फोटो मृत आत्म्यांचे प्रतीक आहेत. त्यामुळे ते देवघरात लावणं योग्य नाही.
advertisement
बेडरूममध्ये चुकूनही लावू नका पूर्वजांचे फोटो
बेडरूम ही अशी जागा आहे जिथे माणूस आराम करतो आणि त्याला मानसिक शांतता हवी असते. इथे पूर्वजांचे फोटो लावल्याने माणसाचं मन वारंवार भूतकाळाकडे जातं. यामुळे नकळत तणाव किंवा भावनिक दबाव येऊ शकतो. विशेषतः नवविवाहित जोडप्यांच्या बेडरूममध्ये असे फोटो लावल्याने त्यांच्या वैयक्तिक जीवनात अडथळे येऊ शकतात. त्यामुळे बेडरूममध्येही पूर्वजांचे फोटो लावणं टाळावं.
advertisement
वास्तुशास्त्रानुसार 'या' दिशेला लावा फोटो
वास्तुशास्त्रानुसार, पूर्वजांचे फोटो दक्षिण दिशेच्या भिंतीवर लावावेत आणि त्यांचे तोंड उत्तर दिशेकडे असावे. असं केल्याने घरात सकारात्मक ऊर्जा टिकून राहते. तसेच पूर्वजांचे आशीर्वादही मिळतात. घराचा ड्रॉइंग रूम किंवा जिथे कुटुंबातील सदस्य एकत्र वेळ घालवतात, ती जागा यासाठी आदर्श मानली जाते. या ठिकाणी तुम्ही रोज दिवा लावूनही त्यांना आदरांजली वाहू शकता. अनेक घरांमध्ये 'श्राद्धांजली भिंत' तयार केली जाते, जिथे फक्त पूर्वजांचेच फोटो असतात. ही पद्धत दिसायलाही सुंदर लागते आणि त्यांना आदर दाखवण्याचं एक योग्य माध्यम ठरते. या जागेमुळे कुटुंबातील नवीन पिढीलाही ते कुठून आले आहेत आणि त्यांनी कोणती मूल्यं घ्यावी, याबद्दल शिकायला मिळतं.
advertisement
हे ही वाचा : कुत्र्याचा राजेशाही थाट! विमानात फिरतो, एसीमध्ये झोपतो... या कुत्र्याकडे आहे पासपोर्ट, इतकंच नाहीतर...
हे ही वाचा : स्वस्तात मस्त! प्लास्टिकच्या ड्रमपासून बनवला कूलर; छोट्याशा कल्पनेमुळे 'ही' व्यक्ती बनली लखपती!
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
May 06, 2025 1:15 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
'या' ठिकाणी चुकूनही लावू नका पूर्वजांचे फोटो, देवघर अन् बेडरूमध्ये फोटो लावणं कितीपत योग्य?