'आमच्यात खूप वाद होतात', वडील महेश कोठारे यांच्यासोबतच्या नात्यावर पहिल्यांदाच बोलला आदिनाथ

Last Updated:
आदिनाथ कोठारेची ‘नशीबवान’ मालिका सुरू झाली असून, कोठारे व्हिजन संस्थेची निर्मिती आहे. आदिनाथ वडील महेश कोठारे यांच्याशी मैत्रीपूर्ण नात्याबद्दल खुलासा केला.
1/6
मुंबई: मराठी चित्रपटसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आदिनाथ कोठारे आता छोट्या पडद्यावरही एंट्री करत आहे. त्याची नवी मालिका ‘नशीबवान’ नुकतीच सुरू झाली.

advertisement
2/6
यानिमित्ताने आदिनाथने एका मुलाखतीत त्याच्या कुटुंबाबद्दल, खासकरून वडील महेश कोठारे यांच्याबद्दल खूप मनमोकळेपणाने सांगितलं, ज्यामुळे सगळेच थक्क झाले आहेत.

3/6
आदिनाथला मुलाखतीत विचारण्यात आलं की, त्याने मालिका करण्याचा निर्णय घेतला, तेव्हा त्याच्या वडिलांची काय प्रतिक्रिया होती? या प्रश्नावर आदिनाथ म्हणाला, “आम्ही सगळेजण एकत्र बसून सगळे निर्णय घेतो. कामाच्या बाबतीतच नाही, तर आयुष्यात इतर कुठलेही अडथळे आले, तर आई-वडील कायम माझ्याबरोबर असतात.”

4/6
तो पुढे म्हणाला, “वडिलांबद्दल बोलायचं झालं, तर आम्ही फक्त वडील आणि मुलगा नसून मित्रांसारखे आहोत. त्यांनीच हे नातं तसं ठेवलं आहे.” त्याने एक खुलासा केला. तो म्हणाला, “आम्ही खूप भांडतो, आमच्यात खूप वादही होतात; पण आम्ही तितकीच मजाही करतो.”

5/6
महत्त्वाची गोष्ट म्हणजे, ‘नशीबवान’ या मालिकेची निर्मिती आदिनाथच्याच ‘कोठारे व्हिजन’ या संस्थेने केली आहे, ज्याची धुरा तो वडिलांबरोबर सांभाळतो. मालिकांमध्ये काम करायला त्याने इतका वेळ का लावला, यावरही त्याने स्पष्टीकरण दिलं.

6/6
आदिनाथ म्हणाला, “मी असं काही ठरवून करीत नाही. जशी चांगली कलाकृती येते, तसं मी त्यात काम करतो. माझ्याकडून एक गोष्ट राहिलेली होती, ती म्हणजे मालिका. प्रत्येक घरातील गृहिणीचं मन जिंकण्यासाठी नशीब लागतं. जर मला ‘रुद्रप्रताप घोरपडे’ बनून ते करता आलं, तर मी स्वतःला नशीबवान समजेन.”

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement