Healthy Friendships Tips : मुलांना शिकवा मैत्रीचे हे 5 महत्त्वाचे नियम, मुलं चुकीच्या व्यक्तींपासून राहतील दूर..
- Published by:Pooja Jagtap
Last Updated:
Teaching kids about healthy friendships : मैत्रीचे नियम मुलांना योग्य वयात वाईट संगतीपासून दूर ठेवू शकतातच, शिवाय त्यांच्या विचारसरणीला आणि वर्तनाला योग्य दिशा देखील देऊ शकतात. प्रत्येक पालकाने हे नियम त्यांच्या मुलासोबत शेअर केले पाहिजेत. चला जाणून घेऊया अशा काही नियमांबद्दल ज्यामुळे मुलांची मैत्री अधिक सुदृढ बनेल.
advertisement
नकारात्मकतेपासून दूर रहा : मुलांना वाईट संगतीपासून दूर राहण्यास शिकवणे महत्वाचे आहे. जर एखादा मुलगा किंवा मित्र नकारात्मक गोष्टी बोलत असेल किंवा वाईट सवयींनी भरलेला असेल तर त्याच्यापासून अंतर ठेवणे चांगले. चांगल्या मित्राचे कर्तव्य आहे की, तो दुसऱ्या मित्राला योग्य मार्गावर घेऊन जाईल, त्याला चुकीचे करण्यास प्रोत्साहन देणार नाही.
advertisement
प्रामाणिकपणा महत्त्वाचा : मुलांना हे समजावून सांगणे देखील महत्त्वाचे आहे की, मैत्रीमध्ये प्रामाणिकपणा आणि विश्वास असावा. जर एखाद्या मित्राने कधीही खोटे बोलले किंवा फसवणूक केली तर ती मैत्री कमकुवत करू शकते. अशाप्रकारे, जर ते एखाद्याशी मैत्री करतात तर त्यांनी नेहमीच प्रामाणिक असले पाहिजे. यामुळे त्यांच्या नात्यात विश्वास टिकून राहील.
advertisement
advertisement
advertisement
सर्वजण सारखे नसतात : मुलांना हे शिकवणे खूप महत्वाचे आहे की, प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. मित्र बनवताना आपण आणि आपला मित्र प्रत्येक बाबतीत सारखे नसू शकतो, हे आपण समजून घेतले पाहिजे. एक चांगला मित्र तो असतो जो आपल्या कमकुवतपणा आणि ताकद दोन्ही समजून घेतो आणि आपण जसे आहोत तसे स्वीकारतो. मुलांना हे समजावून सांगितल्याने ते इतरांबद्दल सहानुभूती आणि समजूतदारपणा विकसित करतील.
advertisement