Indiara Ekadashi: पितरांची शांती आणि मोक्षासाठी इंदिरा एकादशी, पाहा व्रत, पूजा आणि महत्त्व
- Published by:Shankar Pawar
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
Indira Ekadashi: पौराणिक कथेनुसार इंदिरा एकादशीला भगवान श्री कृष्णाने पितरांच्या आत्म्यांना मोक्ष मिळवण्यासाठी व्रताचे महत्व सांगितले आहे.
मुंबई: इंदिरा एकादशी हिंदू धर्मातील एक अत्यंत महत्त्वाची एकादशी आहे. भाद्रपद महिन्याच्या शुद्ध एकादशीला पितरांना तृप्त करण्यासाठी आणि त्यांच्या शांतीसाठी पाळली जाते. ही एकादशी विशेषतः पितृदोष निवारणासाठी केली जाते. पौराणिक कथेनुसार इंदिरा एकादशीला भगवान श्रीकृष्णाने पितरांच्या आत्म्यांना मोक्ष मिळवण्यासाठी व्रताचे महत्त्व सांगितले आहे. या दिवशी विशेषत: पितरांचे स्मरण करून त्यांना शांती देण्यासाठी पूजा केली जाते. याबाबत अधिक माहिती सुखदेव बेडेकर गुरुजी यांच्याकडून जाणून घेऊ.
या दिवशी व्रत करणाऱ्यांना उपवास करण्याची, पवित्र स्नान घेण्याची आणि विशेष ध्यान व जप साधनेची पद्धत आहे. इंदिरा एकादशीला उपवास ठेवण्याचे आणि भक्तिपूर्वक पूजा करण्याचे महत्त्व आहे. व्रतींना विशेषतः सत्य बोलावे लागते, व्रताच्या पूजेत श्रद्धा आणि समर्पण असावे लागते. यावेळी श्रीकृष्णाच्या ‘ॐ नमो भगवते वासुदेवाय’ या मंत्राचा जप केला जातो. या मंत्रामुळे भक्तांना पापमुक्ती, शांती आणि पितरांचा आशीर्वाद प्राप्त होतो.
advertisement
पौराणिक कथा अशी आहे की, एकदा इंद्रदेव (देवांचा राजा) पितरांचा अपमान करून त्यांना रागवले होते. यामुळे पितरांनी रौद्र रूप धारण केले आणि इंद्रदेवांच्या राज्यात एक संकट निर्माण झाले. इंद्रदेवांनी यावर उपाय म्हणून भगवान श्रीकृष्णाची शरण घेतली. भगवान कृष्णाने त्यांना इंदिरा एकादशी व्रत ठेवण्याचा सल्ला दिला. इंद्रदेवांनी श्रीकृष्णांच्या सांगण्यानुसार इंदिरा एकादशी व्रत ठेवले आणि त्यामध्ये पितरांना शांतता मिळाली आणि मोक्ष प्राप्त झाला. या व्रताच्या प्रभावामुळे इंद्रदेवांच्या पापांचे शुद्धीकरण झाले आणि त्यांना पितरांची माफी मिळाली.
advertisement
इंदिरा एकादशीला त्याचप्रमाणे घरातील पितरांचे पूजन करणे, त्यांचे स्मरण करणे, दानधर्म करणे हे महत्त्वाचे आहे. पितरांना शांती मिळवण्यासाठी घरातील लोक या दिवशी दान देऊन, गरिबांना अन्न व वस्त्र दिले जातात. हे सर्व कार्य श्रद्धेने केले जात असल्यास पितरांना शांती प्राप्त होऊन व्रत करणाऱ्याला पुण्य मिळते. अशाप्रकारे इंदिरा एकादशी व्रत आपल्या जीवनातील पापांचा नाश करणारे आणि पितरांच्या आत्म्यांना शांती मिळवणारे एक महत्त्वपूर्ण व्रत आहे, असे बेडेकर गुरुजी सांगतात.
advertisement
(सूचना : येथे दिलेली माहिती धार्मिक श्रद्धेवर आधारित आहे. याला कोणताही शास्त्रीय पुरावा नाही. न्यूज 18 मराठी त्याची हमी देत नाही.)
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 4:50 PM IST
मराठी बातम्या/अध्यात्म/
Indiara Ekadashi: पितरांची शांती आणि मोक्षासाठी इंदिरा एकादशी, पाहा व्रत, पूजा आणि महत्त्व