Ajab Gajab : दररोज 70 चपाती खाऊनही महिला उपाशीच, नक्की हा प्रकार काय? ज्याने ऐकलं त्या प्रत्येकाला बसला धक्का

Last Updated:

आता हे ऐकून तुम्हाला नक्कीच विचित्र वाटेल आणि तुम्ही म्हणाल की ही कसली आली गरीबी? तर थांबा जरा या महिलेची कहाणी थोडीशी वेगळी आहे.

सोर्स : सोशल मीडिया
सोर्स : सोशल मीडिया
मुंबई : आपल्या देशात आजही अनेक लोक गरीब आहेत. काही लोक कसं बसं करुन आपलं पोट भरतात, तर अनेकांवर तर बऱ्याचदा उपाशी पोटी झोपण्याची वेळ येते. त्यात काही लोक फक्ट पाणी पिऊनच आपलं पोट भरतात. पण तुम्हाला ऐकून आश्चर्य वाटेल. अशी एक महिला आहे जी दररोज 70 चपाती खाते पण तरी देखील तिचं पोट भरत नाही आणि तिला उपाशी रहावं लागतं
आता हे ऐकून तुम्हाला नक्कीच विचित्र वाटेल आणि तुम्ही म्हणाल की ही कसली आली गरीबी? तर थांबा जरा या महिलेची कहाणी थोडीशी वेगळी आहे.
28 वर्षांची मंजू सोंधिया एका विचित्र आजाराने त्रस्त आहे. एकेकाळी अगदी निरोगी असलेली मंजू आज अशी स्थिती अनुभवते की, ती खूप खाल्ल्यानंतरही तिला भूक लागते आणि शरीरात कमजोरी जाणवते. म्हणजे तिने कितीही खाल्लं तरी ना तिला तिचं पोट भरलेलं वाटत, ना अंगात काही करायला ताकद रहात. आश्चर्य म्हणजे दररोज इतक्या चपात्या खाऊन कोणीही जाड होईल. पण मंजू मात्र आजही अशक्त आणि कमजोर वाटत आहे.
advertisement
मंजूच्या कुटुंबीयांच्या सांगण्यानुसार, तीन वर्षांपूर्वी तिला टायफॉइड झाला होता. त्यानंतर तिच्या खाण्याच्या सवयींमध्ये विचित्र बदल झाला. सुरुवातीला 20-20 चपात्या ती खाऊ लागली. नंतर-नंतर हा आकडा वाढत जाऊन 60-70 वर पोहोचला.
मोठ्या शहरांत उपचार, पण उपयोग नाही
राजस्थान, कोटा, इंदूर, भोपाल, राजगड अशा अनेक शहरांत तिच्यावर उपचार झाले. पण कोणत्याही डॉक्टरांनी अद्याप ठोस उत्तर दिलं नाही. तिला काही काळ हॉस्पिटलमध्ये दाखलही करण्यात आलं होतं. उपचारानंतर थोडी परिस्थीती सुधारलंी पण पुन्हा जुनं संकट परत आलं.
advertisement
मंजूवर उपचार करणाऱ्या डॉक्टर कोमल दांगी यांनी सांगितलं की, मंजूला सहा महिन्यांपूर्वी मनात भीती वाटत असल्याच्या तक्रारीमुळे दाखल करण्यात आलं होतं. औषधं दिल्यानंतर ती सुधारली, पण पुन्हा कमजोरी आणि भुकेची समस्या वाढली. त्यामुळे तिला मानसोपचार तज्ञाकडे दाखवण्याचा सल्ला देण्यात आला.
मंजूचं लग्न सिंगापूरा गावातील राधेश्याम सोंधिया यांच्याशी झालं असून, तिची सहा वर्षांची मुलगी आणि चार वर्षांचा मुलगा आहे. मात्र, आई असूनही ती स्वतःच्या आरोग्याच्या अजब समस्येमुळे सतत त्रस्त आहे. हा प्रकार गावात चर्चेचा विषय ठरला आहे. "७० चपात्या खाऊनही उपाशी राहणं" ही गोष्ट प्रत्येकाला हादरवून सोडते. आता तिच्या आजाराचं खरं कारण काय आहे आणि यावर योग्य उपचार कसे होतील, याकडे सगळ्यांचं लक्ष लागलं आहे. पण आता मंजू देशभरात चर्चेत आली हे मात्र नक्की.
मराठी बातम्या/लाइफस्टाईल/
Ajab Gajab : दररोज 70 चपाती खाऊनही महिला उपाशीच, नक्की हा प्रकार काय? ज्याने ऐकलं त्या प्रत्येकाला बसला धक्का
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement