Sangali- Miraj GMC Bharti 2025 : सांगली- मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेगाभरती, मिळणार घसघशीत पगार
- Published by:Chetan Bodke
- local18
Last Updated:
GMC Sangali- Miraj Bharti 2025 : राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाने मिरज आणि सांगलीतील वैद्यकीय संस्थांमध्ये गट ड (वर्ग ४) पदांसाठी नोकरी भरतीची घोषणा करण्यात आली आहे.
राज्य शासनाच्या वैद्यकीय शिक्षण आणि औषधी द्रव्य विभागाने मिरज आणि सांगलीतील वैद्यकीय संस्थांमध्ये गट ड (वर्ग ४) पदांसाठी नोकरी भरतीची घोषणा करण्यात आली आहे. अर्ज करण्याची प्रक्रिया पूर्णपणे ऑनलाइन असून ती आयबीपीएस संस्थेच्या माध्यमातून ही नोकरभरती मॅनेज केली आहे. इच्छुक उमेदवार शासकीय वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या वेबसाईटवर जाऊन भरू शकणार आहेत. शिवाय, या वैद्यकीय शिक्षण मंडळाच्या वेबसाइट्सवर संबंधित नोकरीविषयी अधिक माहिती मिळवू शकणार आहे.
मिरज आणि सांगलीच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामधील नोकरभरती 17 सप्टेंबर 2025 पासून सुरू झाली आहे. तर, अर्ज करण्याची अंतिम तारीख 4 ऑक्टोबर, 2025 आहे. अर्ज प्रक्रिया ऑनलाइन पद्धतीने केली जाणार असून तेथील स्थानिक तरूणांना शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये नोकरीची सुवर्णसंधी आहे. राज्य शासनाची ही भरती मोहीम शासकीय वैद्यकीय महाविद्यालय मिरज, शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालय मिरज, पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालय सांगली आणि आरोग्य शिक्षण पथक तासगाव या चार संस्थांमध्ये राबविण्यात येणार आहे.
advertisement
एकूण 263 पद असून या चार महाविद्यालयामध्येच पद विभागण्यात आले आहेत. इच्छुक उमेदवार gmcmiraj.edu.in या वेबसाइट्सवर जाऊन अर्ज करू शकता, शिवाय जाहिरात पाहून विविध पदांसंबंधी अधिक माहिती मिळवू शकतात. सांगली- मिरज भागातील शासकीय वैद्यकीय संस्थांमध्ये गट ड पदांसाठी ही भरती मोहीम एक चांगली संधी आहे. मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये, शिपाई, शवगृह परिचर, प्रयोगशाळा परिचर आणि सुरक्षा रक्षक अशा विविध पदांच्या 47 जागा आहेत. मिरजच्याच शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आणि रुग्णालयामध्ये, वॉर्ड बॉय, फार्मासिस्ट आणि इतर सपोर्ट स्टाफसह 80 जागा आहेत.
advertisement
सांगलीच्या पद्मभूषण वसंतदादा पाटील शासकीय रुग्णालयामध्ये, वॉर्ड बॉय, सुरक्षा रक्षक आणि विविध तांत्रिक पदांच्या 128 जागा आहेत. आरोग्य शिक्षण पथक, तासगाव येथे शिपाई, प्रयोगशाळा परिचर आणि स्वच्छता कामगार अशा पदांच्या एकूण 8 जागा आहेत. ऑनलाइन नोंदणी 17 सप्टेंबर, 2025 पासून सुरू होण्याची शक्यता आहे आणि 7 ऑक्टोबर 205 रोजी रात्री 11:59 वाजता संपेल. ऑनलाइन शुल्क भरण्याची अंतिम तारीख देखील 7 ऑक्टोबर 2025 रात्री 11:59 आहे. परीक्षेच्या अंदाजे 10 दिवस आधी ऑनलाइन प्रवेशपत्र उपलब्ध होतील. जाहिरातीत असेही नमूद केलेय की, वेळापत्रक बदलण्याचा, रिक्त जागांची संख्या बदलण्याचा किंवा भरती प्रक्रिया रद्द करण्याचा अधिकार राखून ठेवणे, असे कोणतेही बदल अधिकृत वेबसाइट्सद्वारे कळवले जातील.
Location :
Maharashtra
First Published :
September 16, 2025 8:05 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sangali- Miraj GMC Bharti 2025 : सांगली- मिरजच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात मेगाभरती, मिळणार घसघशीत पगार