Weather Alert: महाराष्ट्रात पुन्हा पावसाचं तुफान, बुधवारी 19 जिल्ह्यांना अलर्ट

Last Updated:
Weather Alert: महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढला असून बुधवारी पुन्हा 19 जिल्ह्यांना यलो अलर्ट देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.
1/7
गेल्या काही दिवसांत राज्यात पावसाचं धुमशान सुरू आहे. मुंबई, कोकणसह मराठवाड्यात मुसळधार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे काही ठिकाणी नद्यांना पूर आला असून जनजीवन विस्कळीत झालं. पुढील 2 दिवस पावसाचा जोर कायम राहण्याची चिन्हे आहेत. दक्षिण कोकण, दक्षिण मध्य महाराष्ट्र, मराठवाडा या भागांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. 17 सप्टेंबरचा हवामान अंदाज जाणून घेऊ.

advertisement
2/7
मुंबई शहर आणि उपनगरात मध्यम पावसासह अंशतः ढगाळ आकाश राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 29 अंश आणि 24 अंश सेल्सिअस एवढे राहण्याची शक्यता आहे. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग मध्ये अनेक ठिकाणी जोरदार तर काही ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. या तिन्ही जिल्ह्यांना बुधवारी यलो अलर्ट देण्यात आला आहे.

3/7
पश्चिम महाराष्ट्रात देखील पावसाचा जोर पुढील काही दिवस कायम राहण्याची शक्यता आहे. 17 सप्टेंबर रोजी कोल्हापूर वगळता पुणे, सातारा, सांगली आणि सोलापूर या जिल्ह्यांना हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिला आहे. पुढील 24 तासांसाठी चारही जिल्ह्यांना यलो अलर्ट जारी केला आहे.

4/7
मराठवाड्यात देखील 17 सप्टेंबर रोजी मुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट जारी केला आहे. या काळात ताशी 30 ते 40 किमी वेगाने वारे वाहणार असून विजांसह जोरदार पावसाचा अंदाज आहे.

5/7
उत्तर महाराष्ट्रातून पावसाचा जोर काहीसा ओसरणार आहे. अहिल्यानगर वगळता उत्तर महाराष्ट्रातील उर्वरित जिल्ह्यांना कोणताही अलर्ट दिलेला नाही. परंतु, नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार या जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मध्यम पावसाचा अंदाज आहे.

6/7
विदर्भातील पावसाचा जोर कमी होण्याची चिन्हे आहेत. विदर्भातील अमरावती, नागपूर आणि गडचिरोली या तीनच जिल्ह्यांना हवामान विभागाने यलो अलर्ट दिला आहे. तर उर्वरित बुलढाणा, अकोला, वाशिम, यवतमाळ, वर्धा, भंडारा गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस होऊ शकतो.

7/7
विदर्भ आणि तेलंगाना सीमेवर तयार झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यात पावसाचा जोर वाढला आहे. मागील दोन-तीन दिवसांमध्ये मराठवाड्यासह राज्याच्या अनेक भागांमध्ये मुसळधार पाऊस झाला. त्यामुळे अनेक ठिकाणी जनजीवन विस्कळीत झाले. पुढील 2-3 दिवस पावसाचा जोर कायम राहणार असून नागरिकांना योग्य ती काळजी घ्यावी लागेल.

Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement