10th- 12th Exam : 10वी -12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 'हा' नियम नाही पाळला तर वर्ष वाया; परीक्षेतही मोठा बदल

Last Updated:

10th- 12th Exam News : केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहावी- बारावीच्या परीक्षाबाबत विद्यार्थ्यांसाठी CBSE बोर्डाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत.

AI Generated photo
AI Generated photo
दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाची बातमी आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळ (CBSE) ने विद्यार्थ्यांसाठी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. दहावी- बारावीच्या परीक्षाबाबत विद्यार्थ्यांसाठी CBSE बोर्डाने मार्गदर्शक सूचना प्रसिद्ध केल्या आहेत. सीबीएसई बोर्डाने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक सूचना वाचून विद्यार्थ्यांना फार मोठा झटका मिळाला आहे. नेमकं बोर्डाने विद्यार्थ्यांना अशा कोणत्या सूचना दिल्या आहेत, जाणून घेऊया...
केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावी- बारावीच्या विद्यार्थ्यांना परीक्षेबाबत मार्गदर्शक सूचना दिल्या आहेत. जाहीर केलेल्या मार्गदर्शक सूचनांनुसार, विद्यार्थ्यांनी दररोज शाळेत हजेर राहणे, महत्त्वाचे आहे. विद्यार्थ्यांची वर्षभरातील किमान ७५ टक्के उपस्थिती राहणे अनिवार्य आहे. अन्यथा ते विद्यार्थी बोर्डाच्या परीक्षेस बसण्यास अपात्र ठरणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दहावी- बारावीचं वर्ष प्रत्येक विद्यार्थ्यासाठी फार महत्त्वाचं असतं. या परीक्षेच्या माध्यमातूनच कोणताही विद्यार्थी आपलं भविष्य निवडत असतो.
advertisement
विद्यार्थ्याच्या भविष्याचा विचार समोर ठेवून सीबीएसई बोर्डाने आणखी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. विद्यार्थ्याला जर, दहावीची परीक्षा द्यायची असेल, तर नववी आणि दहावी असे दोन्हीही वर्ग शिकलेले असणे बंधन कारक आहे. त्याचप्रमाणे, बारावीची परीक्षा देण्यासाठी अकरावी आणि बारावी या दोन्ही वर्षांचा अभ्यास पूर्ण करणे आवश्यक आहे. केवळ अंतिम वर्षी शिकून परीक्षा देता येणार नाही, असा मंडळाचा इशारा आहे. २०२० च्या राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार, अंतर्गत मूल्यमापन हा परीक्षेचा अविभाज्य घटक आहे, तो दोन वर्षांच्या कालावधीत सातत्याने केला जातो. जर विद्यार्थी शाळेत गैरहजर राहिला, तर त्याचे मूल्यमापन होऊ शकत नाही. अशा विद्यार्थ्यांचा निकाल राखून ठेवून त्यांना 'एसेंशियल रिपीट' श्रेणीत टाकले जाते.
advertisement
बोर्डाने, विषय निवडीबद्दल सांगितले की, दहावीचे विद्यार्थी पाच विषयांसोबत आणखी दोन अतिरिक्त विषय सुद्धा घेऊ शकतात. तर, बारावीच्या विद्यार्थ्यांना एकच अतिरिक्त विषय निवडता येणार आहे. मात्र त्या विषयांसाठी शाळेला बोर्डाकडून परवानगी असणे आवश्यक आहे. तसेच शिक्षक, प्रयोगशाळा आदी आवश्यक सुविधा असणे बंधनकारक आहे. अन्यथा विद्यार्थ्यांना तो विषय मुख्य किंवा अतिरिक्त स्वरूपात घेता येणार नाही. परीक्षेत बसण्याचा अधिकार शाळेत नेहमी उपस्थित राहणाऱ्या आणि सर्व निकष पूर्ण करणाऱ्या विद्यार्थ्यालाच असेल, असेही सीबीएसई बोर्डाने स्पष्ट केले..
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
10th- 12th Exam : 10वी -12वी च्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची बातमी! 'हा' नियम नाही पाळला तर वर्ष वाया; परीक्षेतही मोठा बदल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement