आशिया कपमध्ये उलटफेर, भारत-पाकिस्तान भांडणात कुणाचं लक्षच गेलं नाही, मोठी टीम स्पर्धेतून बाहेर!
- Published by:Shreyas Deshpande
Last Updated:
आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याचा वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही.
दुबई : आशिया कपमध्ये भारत-पाकिस्तान यांच्यातल्या सामन्याचा वाद काही कमी व्हायचं नाव घेत नाहीये. या सामन्यात भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानी खेळाडूंसोबत हस्तांदोलन केलं नाही. भारतीय खेळाडूंनी हस्तांदोलन न केल्यामुळे पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने निषेध नोंदवला आहे. भारतीय खेळाडू खेळ भावनेच्या विरोधात वागल्याची टीका पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने केली आहे.
भारत-पाकिस्तान यांच्यात हस्तांदोलनावरून हा वाद सुरू असतानाच दुसरीकडे आशिया कपमध्ये मोठा उलटफेर होणार आहे, ज्याकडे अनेकांचं लक्षच गेलेलं नाहीये. आशिया कपमधून आज एका मोठ्या टीमला धक्का लागणार आहे. आशिया कपमध्ये आज अफगाणिस्तान आणि बांगलादेश यांच्यात सामना होत आहे. या सामन्यामध्ये बांगलादेशचा पराभव झाला, तर त्यांचं आशिया कपमधील आव्हान ग्रुप स्टेजलाच संपुष्टात येईल. दुसरीकडे अफगाणिस्तान आणि श्रीलंका ग्रुप बी मधून सुपर-4 मध्ये प्रवेश करतील.
advertisement
काय आहे समीकरण?
ग्रुप बीमध्ये श्रीलंकेने 2 पैकी 2 मॅच जिंकल्या आहेत. तर अफगाणिस्तानने एकच मॅच खेळली असून त्यात त्यांचा विजय झाला आहे. बांगलादेशचा 2 पैकी 1 सामन्यात विजय झाला आहे. तर हाँगकाँग 3 पैकी 3 सामन्यात पराभव झाल्यामुळे आधीच बाहेर झाली आहे. अफगाणिस्तानविरुद्धच्या सामन्यात पराभव झाला तर सर्व 3 सामने खेळून बांगलादेशच्या खात्यात फक्त 2 पॉईंट्स राहतील, तर अफगाणिस्तानचे 4 पॉईंट्स होतील, या परिस्थितीमध्ये बांगलादेश स्पर्धेतून बाहेर होईल.
advertisement
या सामन्यात बांगलादेशने विजय मिळवला तरीही त्यांना सुपर-4 मध्ये पोहोचण्यासाठी अफगाणिस्तानवर अवलंबून राहावं लागेल. बांगलादेशने हा सामना जिंकला तर 18 सप्टेंबरला होणाऱ्या अफगाणिस्तान-श्रीलंका मॅचनंतरच ग्रुप बी मधून सुपर-4 च्या 2 टीम ठरतील.
टीम इंडिया क्वालिफाय
दुसरीकडे ग्रुप ए मधून टीम इंडिया आधीच सुपर-4 मध्ये क्वालिफाय झाली आहे. तर दुसऱ्या टीमसाठी पाकिस्तान आणि युएई यांच्यात स्पर्धा आहे. 17 तारखेला पाकिस्तान आणि युएई यांच्यात सामना होणार आहे. या सामन्यात विजय मिळवलेली टीम ग्रुप ए मधून टीम इंडियासोबत सुपर-4 मध्ये प्रवेश करेल. त्यामुळे पाकिस्तान आणि युएई यांच्यासाठी 17 तारखेचा सामना करो या मरो आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 6:30 PM IST
मराठी बातम्या/स्पोर्ट्स/
आशिया कपमध्ये उलटफेर, भारत-पाकिस्तान भांडणात कुणाचं लक्षच गेलं नाही, मोठी टीम स्पर्धेतून बाहेर!