ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात अर्चना कुटे यांना अटक, CID ने पुण्यातून घेतलं ताब्यात

Last Updated:

ज्ञानराधा पतसंस्थेच्या आर्थिक गैर व्यवहार प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी आता तिरूमला कुटे ग्रुपच्या मॅनेजमेंट डायरेक्टर अर्चना कुटे यांना पुण्यामधून अटक करण्यात आली आहे.

archana kute arrested
archana kute arrested
Beed News, Dnaynradha Case : सुरेश जाधव, बीड :  ज्ञानराधा पतसंस्थेच्या आर्थिक गैर व्यवहार प्रकरणात आता मोठी कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणी आता तिरूमला कुटे ग्रुपच्या मॅनेजमेंट डायरेक्टर अर्चना कुटे यांना पुण्यामधून अटक करण्यात आली आहे. सीआयडीच्या संभाजीनगर पथकाने ताब्यात घेतल्याची प्राथमिक माहिती आहे. तसेच या प्रकरणात अर्चना कुटे यांना झालेली अटक महत्त्वाची मानली जात आहे. दरम्यान याआधी ज्ञानराधा पतसंस्थेच्या साडेतीन हजार कोटी घोटाळा प्रकरणात सुरेश कुटे व इतर आरोपींना अटक झाली होती.

ईडीकडून १८८ कोटी किमतीच्या मालमत्तांवर टाच

बीड जिल्ह्यासह संपूर्ण महाराष्ट्रात ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीतील २,४६७ कोटी रुपयांच्या गुंतवणूक फसवणुकीप्रकरणी ईडी अर्थात सक्त वसुली संचलनालयाने १८८ कोटी ४१ लाख रुपये किमतीच्या मालमत्तांवर टाच आणली. आतापर्यंत टाच आणलेल्या मालमत्तांमध्ये कुटे ग्रुपच्या कंपन्यांशी संबधित जमीन, इमारत, प्लांट, यंत्र आदींचा समावेश आहे. या मालमत्ता बीड जिल्ह्यात असल्यााची माहिती ईडीकडून देण्यात आली. आतापर्यंत १६२१ कोटी ८९ लाख रुपयांच्या मालत्तेवर टाच आणण्यात आल्याची माहिती ईडीने दिली आहे.
advertisement
ईडीच्या तपासानुसार, आरोपी सुरेश कुटे आणि संबंधितांनी ज्ञानराधा मल्टिस्टेट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेडच्या माध्यमातून गुंतवणूकदारांची फसवणूक करण्यासाठी अनेक गुंतवणूक योजना राबविण्यात आल्या. गेल्यावर्षी मे ते जुलै महिन्यात कुटे व इतर आरोपींविरोधात फसवणूक व महाराष्ट्र ठेवीदारांच्या हितसुरक्षा कायद्याच्या (एमपीआयडी) कलमांखाली नऊ गुन्हे दाखल झाले होते. सहकारी संस्थेच्या माध्यमातून गुंतवणुकीच्या स्वरूपात २,४६७ कोटी रुपये स्वीकारून फसवणूक करण्यात आल्याचा आरोप आहे. त्या प्रकरणावरून ईडी याप्रकरणी तपास करीत आहे.
advertisement

नेमकं प्रकरण काय? 

ज्ञानराधा मल्टिस्टेट कॉ-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी ही एक सहकारी पतसंस्था आहे, जी महाराष्ट्र आणि इतर राज्यांमध्ये कार्यरत होती. या संस्थेने कथितपणे ४ लाख गुंतवणूकदारांकडून ठेवी स्वीकारल्या आणि नंतर फसवणूक करून ती सुरेश कुटे आणि त्यांच्या पत्नीच्या मालकीच्या कंपन्यांकडे वळवली, असे ईडीने म्हटले आहे. या प्रकरणी, ईडीने सुरेश कुटे आणि इतरांविरुद्ध पीएमएलए कायद्यांतर्गत कारवाई केली आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
ज्ञानराधा मल्टीस्टेट घोटाळ्यात अर्चना कुटे यांना अटक, CID ने पुण्यातून घेतलं ताब्यात
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement