Bollywood Cult Horror : बॉलिवूडचा कल्ट हॉरर सिनेमा, रिलीज होताच ठरला ब्लॉकबस्टर; कमाईतही मोडले रेकॉर्ड

Last Updated:

Bollywood cult horror: सिनेमागृहात प्रेमकथा, अ‍ॅक्शन आणि फॅमिली ड्रामा धुमाकूळ घालत होते. त्याच काळात एक असा सिनेमा आला, ज्याने प्रेक्षकांना पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने घाबरवलं.

बॉलिवूडचा कल्ट हॉरर सिनेमा
बॉलिवूडचा कल्ट हॉरर सिनेमा
मुंबई : 70 चं दशक… सिनेमागृहात प्रेमकथा, अ‍ॅक्शन आणि फॅमिली ड्रामा धुमाकूळ घालत होते. त्याच काळात एक असा सिनेमा आला, ज्याने प्रेक्षकांना पहिल्यांदाच खऱ्या अर्थाने घाबरवलं. मोठे स्टार नव्हते, सेट्स आलिशान नव्हते, बजेट तर फारच कमी होतं… पण तरीही या सिनेमाने कमाईचे विक्रम मोडले. प्रेक्षकांनी थिएटरच्या बाहेर रांगा लावल्या. सिनेमाच्या पोस्टर्सवर लिहिलं होतं, 'भारताचा पहिला हॉरर चित्रपट'. त्या काळी कोणी कल्पनाही केली नव्हती की भीती विकली जाऊ शकते, आणि तीही एवढ्या मोठ्या प्रमाणात.
1972 च्या 30 डिसेंबरला एक कमी बजेटचा चित्रपट थिएटरमध्ये लागला, दो गज जमीन के नीचे. कोणीही अपेक्षा केली नव्हती की हा सिनेमा इतिहास घडवेल. फक्त साडेतीन लाखांच्या बजेटमध्ये बनलेल्या या सिनेमाने तब्बल 50 लाखांची कमाई केली. हा होता रामसे ब्रदर्सचा पहिला हॉरर सिनेमा.
advertisement
महाबळेश्वरमध्ये शूट झालेला हा सिनेमा फारच कमी साधनसामग्रीत तयार झाला. 12 रुपयांमध्ये हॉटेलच्या खोल्या भाड्याने घेतल्या जात होत्या. घरातील स्त्रिया सेटवर स्वयंपाक करत होत्या. दो गज जमीन के नीचे हा केवळ एक सिनेमा नव्हता, तर भारतीय सिनेमातल्या हॉररची सुरुवात होती. रामसे ब्रदर्सने प्रेक्षकांना दाखवलं की भीतीही मनोरंजन बनू शकते.
या एका सिनेमाने रामसे ब्रदर्सना नवा आयाम दिला. त्यानंतर त्यांनी पुराना मंदिर, वीराना, बंद दरवाजा, तहखाना असे एकापेक्षा एक हिट हॉरर सिनेमे दिले.
मराठी बातम्या/मनोरंजन/
Bollywood Cult Horror : बॉलिवूडचा कल्ट हॉरर सिनेमा, रिलीज होताच ठरला ब्लॉकबस्टर; कमाईतही मोडले रेकॉर्ड
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement