1000 रुपयात दुबईमध्ये कितीवेळा खाऊ शकता पोटभर जेवण? उत्तर असं की तुम्ही अंदाजही लावला नसेल

Last Updated:

आता तुम्हाला हा आकडा बघून धक्का बसला असेल आणि तुम्ही विचार करत बसाल की आकड्यावरुन तरी दिसतंय एक वेळचं जेवणं मिळालं तरी खूप आहे, पण असं नाही, जरा थांबा एका भारतीय व्यक्तीने त्याचा अनुभव शेअर केला आहे.

प्रतिकात्मक फोटो
प्रतिकात्मक फोटो
मुंबई : जगभरातील लोकांना आकर्षित करणारं ठिकाण म्हटलं की, दुबईचं नाव पहिल्यांदा घेतलं जातं. बुर्ज खलिफा सारखी जगातील सर्वात उंच इमारत, उंचच उंच टॉवर, रंगतदार नाईटलाइफ, जगमगाट करणारे शॉपिंग मॉल्स आणि चौकाचौकात मिळणारे स्वादिष्ट खाद्यपदार्थ यामुळे दुबई आज सर्वात खास टुरिस्ट डेस्टिनेशन मानलं जातं. अनेक जण इथे फिरण्यासाठी मोठ्या प्रमाणात बचत करतात. पण असा कधी विचार केला आहे का, की फक्त 1000 रुपयांत तुम्ही दुबईत किती वेळा जेवू शकता?
आता आपले 1000 रुपये हे दुबईचे 41.68 दिरहम होतात. आता तुम्हाला हा आकडा बघून धक्का बसला असेल आणि तुम्ही विचार करत बसाल की आकड्यावरुन तरी दिसतंय एक वेळचं जेवणं मिळालं तरी खूप आहे, पण असं नाही, जरा थांबा एका भारतीय व्यक्तीने त्याचा अनुभव शेअर केला आहे आणि त्याच्या अनुभवातूनच याचा सारांश सांगितला जाणार आहे. ही व्यक्ती एक युट्युबर आहे आणि त्याने एक व्हिडीओ आणि आपला अनुभव सोशल मीडियावर शेअर केला आहे.
advertisement
एका दिरहममध्ये बोट राईड
युट्युबर काश चौधरीने आपला प्रवास दुबई बोट स्टेशनपासून सुरू केला. फक्त 1 दिरहम मध्ये त्याने बोट राईडचा आनंद घेतला. शहराच्या सौंदर्याचा मजा घेण्यासाठी हा स्वस्त आणि मजेशीर पर्याय ठरला.
देसी डेरा रेस्टॉरंटमध्ये जेवण
यानंतर पोटाला भूक लागल्यावर तो "देसी डेरा" नावाच्या रेस्टॉरंटमध्ये गेला. हे ठिकाण भारतीय जेवणासाठी प्रसिद्ध आहे. इथे त्याने आलू पराठा आणि फ्रेश मिल्क टी फक्त 11 दिरहम मध्ये खाल्ली. पराठा खूप मोठा होता पण त्याला ‘बेबी पराठा’ असं म्हटलं जातं. इथेपर्यंत त्याचा एकूण खर्च 12 दिरहम झाला, ज्यामध्ये 1.5 दिरहम पाण्याच्या बाटलीवर गेले.
advertisement
शॉपिंग आणि मेट्रो प्रवास
यानंतर त्याने शॉपिंग करताना फ्रूट टी आणि चॉकलेट्स घेतल्या, ज्यावर 10 दिरहम खर्च झाले. दुबईतील या चॉकलेट्स तुर्की आणि इराणमधून येतात आणि चवीलाही अप्रतिम असतात. आता त्याचा एकूण खर्च 22 दिरहम झाला. यानंतर तो मेट्रोने बुर्ज खलिफा कडे रवाना झाला. मेट्रो भाडं फक्त 8 दिरहम आलं. अशा प्रकारे बुर्ज खलिफाचा आनंद घेतल्यावर त्याचा खर्च 36.2 दिरहमपर्यंत पोहोचला.
advertisement
मग 1000 रुपयांत किती वेळा जेवण मिळेल?
संपूर्ण दिवस त्याने 44-45 दिरहममध्ये घालवला. त्यातील 11 दिरहममध्ये सकाळचं भरपेट जेवण झालं. जर त्याच रेस्टॉरंटमध्ये दुपारचं आणि रात्रीचं जेवण केलं, तर 22-33 दिरहममध्ये 2-3 वेळा पोटभर जेवण सहज शक्य आहे.
पण जर शॉपिंग किंवा ट्रॅव्हलचा खर्च धरला, तर खाण्याचं बजेट कमी होतं. शेवटी त्याच्याकडे 6.25 दिरहम उरले, ज्यातून त्याने दुबई मॉलमध्ये छोट्यामोठ्या वस्तू घेतल्या.
advertisement
दुबई महागडं शहर असलं तरी 1000 रुपयांत इथे 2-3 वेळा पोटभर जेवण करणं शक्य आहे, जर तुम्ही लोकल रेस्टॉरंट आणि स्वस्त पर्याय निवडले तर. पण जर लक्झरी हॉटेल्समध्ये जेवायचं ठरवलं, तर 100 दिरहमपेक्षा कमीमध्ये काही मिळणं जवळपास अशक्य आहे. त्यामुळे बजेटमध्ये दुबई फिरायचं असेल, तर प्लॅनिंग करून आणि योग्य ठिकाणं निवडून प्रवास केलात तर खिशावर जास्त ताण येणार नाही.
मराठी बातम्या/मनी/
1000 रुपयात दुबईमध्ये कितीवेळा खाऊ शकता पोटभर जेवण? उत्तर असं की तुम्ही अंदाजही लावला नसेल
Next Article
advertisement
Actress Life: पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
पहिल्याच सिनेमातून मिळालं स्टारडम, तरीही बॉलिवूडला केला रामराम अन् बनली ज्योतिषी
    View All
    advertisement