छगन भुजबळांना मोठा दिलासा, महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करणारे चमणकर बंधू दोषमुक्त
- Published by:Prachi Amale
- Reported by:PRANALI KAPASE
Last Updated:
महाराष्ट्र सदन बांधकामामध्ये चिमणकर बंधूंनी भुजबळ कुटुंबियांना लाच दिल्याचा आरोप होता.
मुंबई: महाराष्ट्र सदन बांधकाम घोटाळा प्रकरणात मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करणारे चिमणकर बंधू दोषमुक्त करण्यात आलं आहे. न्यायमूर्ती अजय गडकरी आणि राजेश पाटील यांच्या खंडपीठाने कृष्णा चमणकर, प्रशांत चमणकर आणि प्रसन्न चमणकर यांना दोषमुक्त केलं.
महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी तत्कालीन बांधकाम मंत्री छगन भुजबळ यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करण्यात आले होते. या प्रकरणी भुजबळ काही काळ तुरुंगातही जाऊन आले. महाराष्ट्र सदन घोटाळ्याप्रकरणी न्यायालयाने भुजबळांना क्लीनचिट दिली. याच प्रकरणात चमणकर बंधूंना आता दोषमुक्त करण्यात आलं आहे. महाराष्ट्र सदन बांधकामामध्ये अनियमितता केल्याचा आरोप करण्यात आला होता. चिमणकर बंधूंनी भुजबळ कुटुंबियांना लाच दिल्याचा आरोप होता.
advertisement
महाराष्ट्र सदन घोटाळा काय आहे?
छगन भुजबळ हे सार्वजनिक बांधकाम मंत्री असताना त्यांच्या काळात महाराष्ट्र सदन बांधकामात घोटाळा झाल्याचा आरोप त्यांच्यावर होता. विविध कंत्राटाच्या माध्यमातून छगन भुजबळ यांना लाखो रुपये लाच म्हणून देण्यात आल्याचा आरोप होता. या प्रकरणी सक्तवसुली संचलनालयानेही छगन भुजबळांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.भुजबळांची 200 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली तपासा दरम्यान भुजबळांच्या विरोधात सबळ पुरावे आढळून आल्याचं म्हटलं गेलं सुधारित कलमे लाऊन खटला मजबूत करण्यात आला यानंतर 2016 ते 2018 या कालावधीत छगन भुजबळ यांना जेलमध्ये जावं लागलं होतं.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 8:00 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
छगन भुजबळांना मोठा दिलासा, महाराष्ट्र सदनाचे बांधकाम करणारे चमणकर बंधू दोषमुक्त