Rishi Kapoor: अभिनेत्रीची उंची पाहून चिडले होते ऋषी कपूर, सेटवरच घातला धिंगाणा, डायरेक्टरनेही धरले कान, असं काय घडलेलं?
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
Rishi Kapoor:बॉलिवूडमध्ये नायक नेहमीच नायिकेपेक्षा उंच दिसावा अशी प्रेक्षकांची अपेक्षा असते. पण जेव्हा परिस्थिती उलटी होते, तेव्हा सेटवर छोटा-मोठा गोंधळ होतो.
मुंबई : बॉलिवूडमध्ये नायक नेहमीच नायिकेपेक्षा उंच दिसावा अशी प्रेक्षकांची अपेक्षा असते. पण जेव्हा परिस्थिती उलटी होते, तेव्हा सेटवर छोटा-मोठा गोंधळ होतो. अशीच एक घटना 1977 च्या सुपरहिट चित्रपटाच्या सेटवर घडली. अभिनेत्रीच्या उंचीमुळे ऋषी कपूर संतापले होते.
'हम किसी से कम नहीं' या चित्रपटाचे मुख्य नायक होते दिवंगत अभिनेता ऋषी कपूर. त्यांच्यासोबत झीनत अमान ही नायिका होती. झीनत अमान उंच बांध्याची होती, त्यामुळे दोघे जेव्हा कॅमेऱ्यासमोर आले तेव्हा फरक स्पष्ट दिसत होता. हे पाहून ऋषी कपूर अस्वस्थ झाले आणि त्यांनी दिग्दर्शकावर नाराजी व्यक्त केली.
advertisement
झीनत अमानने याविषयी एका मुलाखतीत उल्लेख केला. तिने सांगितलं की चित्रपटातील एका कव्वाली गाण्यात ऋषी कपूर यांच्यासोबत फ्लर्टिंग सीन शूट करायचा होता. पण माझी उंची जास्त असल्यामुळे ते खूप चिडले. अखेरीस उपाय म्हणून ऋषी कपूरना सोफ्यावर बसवण्यात आले. इतकेच नव्हे तर त्यांना दोन गाद्यांवर बसवले गेले, जेणेकरून उंचीचा फरक दिसू नये.
advertisement
ही घटना तेव्हाही चित्रपटसृष्टीत चर्चेचा विषय ठरली होती आणि आजही चाहत्यांना ती किस्सा म्हणून आवडते. ऋषी कपूर आणि झीनत अमान यांची जोडी त्या काळी हिट मानली जात होती. हम किसी से कम नहीं हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर प्रचंड यशस्वी ठरला आणि त्यातील गाणी आजही लोकांच्या ओठावर आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
September 16, 2025 10:01 PM IST
मराठी बातम्या/मनोरंजन/
Rishi Kapoor: अभिनेत्रीची उंची पाहून चिडले होते ऋषी कपूर, सेटवरच घातला धिंगाणा, डायरेक्टरनेही धरले कान, असं काय घडलेलं?