सोलापूर : आज अनेक तरुण नोकरी न करता व्यवसायाच्या माध्यमातून आपली उपजीविका भागवत आहेत. तसेच त्यातून चांगली कमाई करुन सर्वांसमोर एक चांगले उदाहरण सादर करत आहेत. आज अशाच एका तरुणाची प्रेरणादायी कहाणी जाणून घेणार आहोत.
हा तरुण आज कुल्हड चहाविक्री करुन आज महिन्याला लाखो रुपयांची कमाई करत आहे. दररोज 300 ते 350 कप चहा विकून दिवसाला तीन ते चार हजार रुपयांची कमाई करुन महिनाअखेर पर्यंत लाखो रुपये कमवत आहे.
advertisement
सोलापूर शहारातील सात रस्ता येथे या तरुणाची एक लहानशी कॅन्टीन आहे. 15 रुपये, 20 रुपये दराने चहा विकून हा तरूण महिन्याखेरपर्यंत लाखो रुपयांची कमाई करत आहे. दररोज 300 ते 350 कप चहा विकून 3 ते 4 हजार रुपयांची कमाई करुन महिनाअखेर पर्यंत लाखो रुपये कमवत आहे.
नवल किशोर असे या तरुणाचे नाव आहे. सकाळपासून रात्रीपर्यंत याठिकाणी चहाप्रेमींची मोठी गर्दी पाहायला मिळते. रस्त्यालगतच्या चहाच्या दुकानात कुल्हड दिसला की चहा पिण्याची मजा द्विगुणित होते. महाविद्यालयीन तरुणांमध्ये कुल्हड चहा खूप प्रसिद्ध आहे. अद्रक, इलायची टाकून हा चहा तयार केला जातो. त्यानंतर आगीवर मातीचे कप म्हणजेच कुल्हड हे गरम करतात. त्यानंतर गरम केलेले कुल्हड कप चहामध्ये टाकून चहा तयार करून ग्राहकांना देतात. एका कुल्हड चहाच्या कपाची किंमत 15 रूपये आहे.
Vegetables price : भाज्या महागल्या, पुण्यात किलोचे दर शंभरी पार, काय आहे नेमकं कारण?
नवल किशोर या तरुणाचे सोलापूर शहारत आणखी दोन ठिकाणी चहाची कॅन्टींग आहे. या ठिकाणी चहा पिण्यासाठी कॉलेजचे तरुण-तरुणी यांची मोठी गर्दी असते. सकाळपासून रात्रीपर्यंत याठिकाणी चहाप्रेमींची गर्दी याठिकाणी पाहायला मिळते. चहा विक्रीचा व्यवसाय खूप व्यापक आहे आणि गेल्या काही दिवसांपासून हा लोकांचा आवडता स्टार्टअप बनत आहे.





