TRENDING:

कोरोनात पुण्यातील अभ्यासिका बंद पडली, सोलापुरात तरुणाने घेतला मोठा निर्णय, आज वर्षाला लाखोंची उलाढाल

Last Updated:

स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सोलापुरातील विद्यार्थी हे पुणे येथे जातात. तेथे त्यांना राहण्याची, जेवणाची व इतर गोष्टींचा खूप खर्च करावा लागतो. सोलापुरात आल्यानंतर मकरंद साळवे यांनी याबाबत विचार केला.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इरफान पटेल, प्रतिनिधी
advertisement

सोलापूर : सोलापूर शहरातील नवी पेठेत तसेच आरटीओ रोड, विजापूर नाका या ठिकाणी गरीब, गरजू, होतकरू विद्यार्थ्यांसाठी अभ्यासाची सोय व्हावी, म्हणून मकरंद साळवे यांनी भारत अभ्यासिका सुरू केली आहे. स्पर्धा परिक्षेसाठी योग्य मार्गदर्शनाची गरज आहे. त्यासाठी अशा अभ्यासिकेतून ते मिळणे गरजेचे आहे. ग्रामीण भागातील मुलांच्यात जिद्द आहे. पण आर्थिक पाठबळ नसल्याने त्यांना अशा किफायतशीर, सुसज्य अभ्यासिका उपयोगी पडतील, असा विश्वास त्यांनी लोकल18 शी बोलताना व्यक्त केला.

advertisement

मकरंद साळवे हे सोलापूर येथील रहिवासी आहेत. त्यांनी 2015 मध्ये पदवीचे शिक्षण पूर्ण केले. यानंतर ते एमपीएससीची तयारीसाठी पुण्यातील सदाशिव पेठ येथे गेले. त्यांनी अभ्यास करण्यासाठी याठिकाणी एक अभ्यासिकाही ज्वाईन केली होती. त्या अभ्यासिकेत केंद्रात बसायलाही लवकर जागा मिळत नव्हती. मकरंद साळवे आपल्या मित्रांसमवेत चहा पिण्यासाठी गेले असताना त्यांच्या मनात एक विचार आला.

advertisement

व्यवसाय म्हणून आपणही अभ्यासिका केंद्र सुरू करायचे का, अशी चर्चा त्यांच्यात झाली. चहा हॉटेलच्या जवळच असलेल्या एका हॉलला त्यांनी भेट दिली आणि त्या हॉलमध्ये मकरंद साळवे व त्यांच्या मित्रांनी अभ्यासिका सुरू केली. अभ्यासिका नव्याने सुरू केल्यावर त्यांना चांगलाच प्रतिसाद मिळाला. त्यानंतर मात्र, मार्च 2020 मध्ये कोरोनाची लाट आली आणि त्याचा परिणाम अभ्यासिका केंद्रावरही झाला होता. त्यानंतर मकरंद साळवे हे सोलापुरात आले.

advertisement

नोकरी नव्हे तर व्यवसायातून केली या तरुणाने प्रगती, हवं तसं काम न मिळाल्याने घेतला मोठा निर्णय अन् आज...

सोलापुरात आल्यानंतर मकरंद साळवे यांनी विचार केला. स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी सोलापुरातील विद्यार्थी हे पुणे येथे जातात. तेथे त्यांना राहण्याची, जेवणाची व इतर गोष्टींचा खूप खर्च करावा लागतो. त्यामुळे त्यांनी पुण्यातील अभ्यासिकेचे संपूर्ण फर्निचर सोलापुरात आणले आणि पुन्हा एकदा नव्याने सोलापुरात भारत अभ्यासिका या नावाने अभ्यासिका केंद्र सुरू केले.

advertisement

सोलापुरातील विद्यार्थ्यांना पुणे येथे स्पर्धा परीक्षेची तयारी करण्यासाठी न जाता सोलापुरातच त्यांना स्पर्धा परीक्षेचे तयारी करता यावी, या उद्देशाने त्यांनी सोलापुरात अभ्यासिका सुरू केली. सुरुवातीच्या काळात जवळजवळ 4 ते 5 विद्यार्थ्यांनी अभ्यासिका केंद्रात प्रवेश घेतला होता. मात्र, आज भारत अभ्यासिकाला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सोलापुरात आता 2 शाखा नव्याने उघडण्यात आल्या आहे.

गणेशोत्सव 2024 : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, विशेष सात ट्रेन सोडल्या जाणार..

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
45 वर्षांपासून जपलीये तिच चव, सोलापुरातील फेमस शिक कढई, एकदा खाल तर पुन्हा याल
सर्व पहा

अभ्यासिका केंद्रात विद्यार्थ्यांसाठी चांगल्या पद्धतीने सोयदेखील करण्यात आली आहे. विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका केंद्रात एसी हॉल, नॉन एसी हॉल, एमपीएससी, यूपीएससीची मोठ्या प्रकाशकांची पुस्तके, स्वतंत्र बैठक व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची सोय, महिला विद्यार्थ्यांसाठी स्वतंत्र स्वच्छतागृह, या अभ्यासिकेत आहे. अभ्यास करण्यासाठी जी शांतता विद्यार्थ्यांना लागते, ती शांतता या अभ्यासिकेत आहे. अभ्यासिका केंद्रात एका विद्यार्थ्याला प्रवेश फी 600 रुपये इतकी आहे. या अभ्यासिकेची वार्षिक उलाढाल 4 ते 5 लाख रुपये होत आहे.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
कोरोनात पुण्यातील अभ्यासिका बंद पडली, सोलापुरात तरुणाने घेतला मोठा निर्णय, आज वर्षाला लाखोंची उलाढाल
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल