गणेशोत्सव 2024 : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, विशेष सात ट्रेन सोडल्या जाणार..

Last Updated:

कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी व्यवस्था व्हावी, त्यांना कोणताही त्रास होऊ नये याच उद्देशाने कोकण रेल्वे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे.

फाईल फोटो
फाईल फोटो
साक्षी पाटील, प्रतिनिधी
ठाणे : गणेशोत्सवासाठी कोकणात गावी जाणाऱ्या मुंबईकरांना मोठा दिलासा मिळणार आहे. आगामी गणेशोत्सव लक्षात घेऊन कोकण रेल्वेने एकूण 7 विशेष गाड्या कोकणवासीयांसाठी सोडण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचं आरक्षण 21 जुलैपासून सकाळी 8 वाजता सुरू होणार आहे.
कोकणात जाणाऱ्या प्रवाशांची मोठी व्यवस्था व्हावी, त्यांना कोणताही त्रास होऊ नये याच उद्देशाने कोकण रेल्वे प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गणेशोत्सवात प्रवाशांना मोठा दिलासा मिळणार आहे. या गणपती विशेष गाड्यांचे आरक्षण रविवार 21 जुलैपासून सकाळी 8 वाजता सुरू होईल, अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे.
advertisement
1) मुंबई सीएसएमटी - सावंतवाडी डेली स्पेशल (36 फेऱ्या) - 01151
छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 1 सप्टेंबर 2024 पासून 18 सप्टेंबर 2024 पर्यंत (18 फेऱ्या) दररोज रात्री 00.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी 14.20 वाजता सावंतवाडी येथे पोहोचेल. 01151 स्पेशल सावंतवाडीवरून 1 सप्टेंबर 2024 पासून 18 सप्टेंबर 2024 पर्यंत (18 फेऱ्या) दररोज 15.10 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी 04.35 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
advertisement
कुठे थांबणार : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावड, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग आणि कुडाळ.
2) मुंबई सीएसएमटी - रत्नागिरी डेली स्पेशल (एकूण 36 फेऱ्या) 01153
स्पेशल छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथून 1 सप्टेंबर 2024 पासून 18 सप्टेंबर 2024 पर्यंत (18 फेऱ्या)
advertisement
दररोज सकाळी 11.30 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 20.10 वाजता रत्नागिरी येथे पोहोचेल. 01154 स्पेशल रत्नागिरीवरून 1 सप्टेंबर 2024 पासून 18 सप्टेंबर 2024 पर्यंत (18 फेऱ्या) दररोज पहाटे 4 वाजता सुटेल आणी त्याच दिवशी दुपारी 13.30 वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
कुठे थांबणार : दादर, ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावडाव, आरवली रोड, संगमेश्वर रोड.
advertisement
डब्यांची रचना : 12 स्लीपर क्लास, 04 जनरल, 2 थ्री टायर एसी आणि 2 एसएलआर, असे एकूण 20 डबे
3) एलटीटी - कुडाळ डेली स्पेशल (36 फेऱ्या) - 01167
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून 1 सप्टेंबर 2024 पासून 18 सप्टेंबर 2024 पर्यंत (18 फेऱ्या) दररोज रात्री 21.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 09.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल. 01168 स्पेशल कुडाळवरून 01.09.2024 ते 18.09.2024 (18 फेऱ्या) दररोज दुपारी 12.00 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 00.40 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
advertisement
कुठे थांबणार : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, अंजनी, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
डब्यांची रचना : 12 स्लीपर क्लास, 4 जनरल, 2 थ्री टायर एसी आणि 2 एसएलआर असे एकूण 20 डबे
advertisement
4) एलटीटी - सावंतवाडी डेली स्पेशल (36 फेऱ्या) - 01171
स्पेशल एलटीटी मुंबई येथून 1 सप्टेंबर 2024 पासून 18 सप्टेंबर 2024 पर्यंत (18 फेऱ्या) दररोज सकाळी 08.20 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी रात्री 21.00 वाजता सावंतवाडी येथे पोहचेल. 01172 स्पेशल सावंतवाडीवरून 1 सप्टेंबर 2024 पासून 18 सप्टेंबर 2024 पर्यंत (18 फेऱ्या) पर्यंत दररोज रात्री 22.20 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी सकाळी 10.40 वाजता एलटीटी मुंबई येथे पोहोचेल.
कुठे थांबणार : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
डब्यांची रचना : 12 स्लीपर क्लास, 04 जनरल, 2 थ्री टायर एसी आणि 2 एसएलआर असे एकूण 20 डबे
5) दिवा चिपळूण मेमू स्पेशल (एकूण 36 फेऱ्या) 01155
मेमू स्पेशल दिवा येथून 1 सप्टेंबर 2024 पासून 18 सप्टेंबर 2024 पर्यंत (18 फेऱ्या) दररोज सकाळी 07.15 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी दुपारी 14.00 वाजता चिपळूण येथे पोहोचेल. 01156 मेमू स्पेशल चिपळूणवरून 1 सप्टेंबर 2024 पासून 18 सप्टेंबर 2024 पर्यंत (18 फेऱ्या) दररोज दुपारी 15.30 वाजता सुटेल आणि त्याचदिवशी रात्री 22.50 वाजता दिवा येथे पोहोचेल.
कुठे थांबणार : दिवा, निळजे, तळोजा, कळंबोली, पनवेल, सोमाटणे, रसायनी, आपटा, जिते, हमरापूर, पेन, कासू, नागोठणे, निडी, रोहा, कोलाड, इंदापूर, माणगाव, गारगाव, सापे वामने, करंजाडी, विन्हेरे, कळंबणी, खेड, अंजनी.
6) एलटीटी - कुडाळ स्पेशल (16 सेवा) - 01185
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून 2 सप्टेंबर 2024 ते 18 सप्टेंबर 2024 पर्यंत (8 फेऱ्या) सोमवार, बुधवार आणि शनिवारी रात्री 00.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 12.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल. 01186 स्पेशल कुडाळवरून 2 सप्टेंबर 2024 ते 18 सप्टेंबर 2024 पर्यंत (8 फेऱ्या) सोमवार, बुधवार आणि शनिवारी संध्याकाळी 16.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 04.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
कुठे थांबणार : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
डब्यांची रचना: 12 स्लीपर क्लास, 04 जनरल, 2 थ्री टायर एसी आणि 2 एसएलआर असे एकूण 20 डबे
7) एलटीटी कुडाळ स्पेशल (6 सेवा) - 01165
लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथून 3 सप्टेंबर 2024 ते 18 सप्टेंबर 2024 (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी रात्री 00.45 वाजता सुटेल आणि त्याच दिवशी सकाळी 12.30 वाजता कुडाळ येथे पोहोचेल. 01166 स्पेशल कुडाळवरून 3 सप्टेंबर 2024 ते 18 सप्टेंबर 2024 (3 फेऱ्या) पर्यंत मंगळवारी संध्याकाळी 16.30 वाजता सुटेल आणि दुसऱ्या दिवशी मध्यरात्री 04.50 वाजता लोकमान्य टिळक टर्मिनस मुंबई येथे पोहोचेल.
कुठे थांबणार : ठाणे, पनवेल, रोहा, माणगाव, वीर, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड, संगमेश्वर रोड, रत्नागिरी, आडवली, विलवडे, राजापूर रोड, वैभववाडी रोड, नांदगाव रोड, कणकवली, सिंधुदुर्ग.
डब्यांची रचना : 12 स्लीपर क्लास, 4 जनरल, 2 थ्री टायर एसी आणि 2 एसएलआर असे एकूण 20 डब्बे
मराठी बातम्या/महाराष्ट्र/ठाणे/
गणेशोत्सव 2024 : मुंबईतून कोकणात जाणाऱ्या प्रवाशांसाठी रेल्वेचा मोठा निर्णय, विशेष सात ट्रेन सोडल्या जाणार..
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement