रेल्वे प्रवाशांची अस्वच्छ पांघरुणाची चिंता मिटणार, आता मिळणार ‘एआय’चे पांघरूण, देशातील पहिला प्रयोग पुण्यात
- Published by:News18 Marathi
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
प्रवाशांचा रेल्वे प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. या प्रयोगामुळे प्रवाशांची अस्वच्छ बेडशीट, उशी आणि ब्लॅकेट यापासून सुटका होणार आहे.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे: भारतीय रेल्वेला देशाची जीवनवाहिनी म्हणून ओळखले जाते. याच रेल्वेने रोज दोन कोटी पेक्षा जास्त प्रवाशी हे प्रवास करत असतात. मात्र, बऱ्याचवेळी प्रवाशांना बेडशीट, आणि ब्लॅकेट अस्वच्छ दिले जातात. त्यामुळे प्रवाशांकडून रेल्वेकडे तक्रार केली जाते. त्यामुळे पुणे रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना दिल्या जाणाऱ्या बेडशीट आणि ब्लॅकेटसाठी लिनन 'एआय'चा वापर करण्याचे ठरविले आहे. त्यामुळे प्रवाशांचा रेल्वे प्रवास आता आणखी सुखकर होणार आहे. या प्रयोगामुळे प्रवाशांची अस्वच्छ बेडशीट, उशी आणि ब्लॅकेट यापासून सुटका होणार आहे.
advertisement
प्रवाशांना स्वच्छ आणि चांगल्या दर्जाचे 'लिनन' मिळावे, यासाठी रेल्वेने आपल्या 'बूट लाउंड्री' मध्ये 'एआय'चा वापर करण्याचे ठरविले आहे. देशात पहिल्यांदाच 'लिनन'साठी असा वापर केला जात आहे. त्यामुळे प्रवाशांना रेल्वेत आता स्वच्छ पांघरूण मिळेल. वातानुकूलित डब्यातून प्रवास करताना प्रवाशांना अनेकदा अस्वच्छ बेडशीट, उशी आणि नॅपकिन दिले जातात. प्रवासी वारंवार यासंदर्भात तक्रार करतात. कधी त्यांना ते बदलून दिले जाते तर कधी नाही. मात्र आता पुण्यातून प्रवास करणाऱ्या प्रवाशांना असा अनुभव येणार नाही. कारण रेल्वे प्रशासन घोरपडी येथील बूट लाउंड्रीमध्ये 'एआय'चा वापर करणार आहे. ब्लॅकेट मिळावे म्हणून लाउंड्रीमध्ये पहिल्यादांच एआयचा वापर केला जाणार आहे. सध्या याची चाचणी सुरू असून लवकरच पूर्ण पणे चालू करण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे विभागीय रेल्वे व्यवस्थापक इंदू दुबे यांनी दिली आहे.
advertisement
असा होणार 'एआय'चा वापर
कपडे धुतल्यानंतर ते वाळविण्यापूर्वी एआय कॅमेरे योग्य पद्धतीने स्कॅन करतील. ठरलेल्या प्रमाणापेक्षा स्वच्छता कमी असेल तर ते कापड बाजूला केले जाईल.
असे कापड पुन्हा एकदा धुण्यासाठीची सूचना केली जाईल. ही बाब लक्षात येण्यासाठी विशिष्ट प्रकारचा आवाज (सायरन) देखील येईल.
advertisement
अशी आहे लाउंड्री
दिवसाला 20 हजार बेडशीट, पिलो आणि नॅपकिनची स्वच्छता आणि मिनिटाला 6 बेडशीटची एआयकडून तपासणी होणार आहे. दिवसाला 8 टन वजनाचे कपडे धुण्याची क्षमता असणार आहे. पुण्यातून सुटणाऱ्या 15 रेल्वेंना लिनन देण्याची क्षमता आहे.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
July 19, 2024 11:53 AM IST
मराठी बातम्या/पुणे/
रेल्वे प्रवाशांची अस्वच्छ पांघरुणाची चिंता मिटणार, आता मिळणार ‘एआय’चे पांघरूण, देशातील पहिला प्रयोग पुण्यात