TRENDING:

Solapur News : मशिदीत नेमकं काय असतं?, मुस्लिमेतर बांधवांनी जाणुन घेतले आतील उपक्रम

Last Updated:

मशीद म्हणजे काय? तिथे काय नेमकं काय केलं जातं? अजान, वजु, नमाज म्हणजे काय? असे विविध प्रश्न सर्वसामान्य मुस्लिमेतर बांधवाच्या मनात असतात.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
इरफान पटेल, प्रतिनिधी
advertisement

सोलापूर : इस्लाम धर्मियांचे प्रार्थना स्थळ असलेल्या मशिदीची ओळख सर्वसामान्य नागरिकांना व्हावी, या उद्देशाने सोलापुरात दरवर्षी एक अनोखा उपक्रम राबवला जातो. जमीयत ए अहले हदिस यांच्या वतीने यावर्षीही चार हुतात्मा चौक समोरील हाजी हजरत खान मस्जिद या ठिकाणी या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले. उपक्रमाचे उद्घाटन अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते पार पडले.

advertisement

मुस्लिम बांधवाचे प्रार्थना स्थळ असलेल्या मस्जिद विषयी अनेकांच्या मनामध्ये कुतूहल असते. मशीद म्हणजे काय? तिथे काय नेमकं काय केलं जातं? अजान, वजु, नमाज म्हणजे काय? असे विविध प्रश्न सर्वसामान्य मुस्लिमेतर बांधवाच्या मनात असतात. या प्रश्नांची उकल व्हावी तसेच सोलापुरात सामाजिक सलोखा अबाधित राहावा यासाठी मेक इंडिया बेटर कॅम्पेन अंतर्गत या कार्यक्रमाचे आयोजन केले.

advertisement

अजित दादांनी भेट दिलेले पुण्यातील हे मंदिर कोणते, अनोखा आहे इतिहास, VIDEO

अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर मोनिका सिंग ठाकूर यांच्या हस्ते या उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर मोनिका सिंग ठाकूर यांच्यासह सर्व उपस्थित मान्यवरसह सर्वांनी मशीदबाबत अगदी उत्सुकतेने माहिती जाणून घेतली. प्रारंभी जमीयतच्या वतीने अप्पर जिल्हाधिकारी सोलापूर मोनिका सिंग ठाकूर यांच्यासह सर्व मान्यवरांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत करण्यात आले.

advertisement

हिंदू पंचांग नेमके कसे पाहतात, हे कुणी तयार केलं?, जाणून घ्या, याचे वैज्ञानिक आणि धार्मिक महत्त्व..

मस्जिद परिचय हा उपक्रम 15 ते 17 ऑगस्ट दरम्यान दुपारी साडेतीन ते रात्री 10 वाजेपर्यंत आयोजित करण्यात आला आहे. चार हुतात्मा चौक समोरील हाजी हजरत खान मशीद या ठिकाणी हे उपक्रम आयोजित केले आहे. ही मशीद तब्बल 105 वर्ष जुनी आहे. हे उपक्रम सर्वधर्मीय नागरिकांसाठी असून महिलांसाठी देखील मशीदीत प्रवेश खुला असणार आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
Solapur News : मशिदीत नेमकं काय असतं?, मुस्लिमेतर बांधवांनी जाणुन घेतले आतील उपक्रम
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल