अजित दादांनी भेट दिलेले पुण्यातील हे मंदिर कोणते, अनोखा आहे इतिहास, VIDEO
- Published by:Khushalkant Dusane
- local18
- Reported by:Prachi Balu Kedari
Last Updated:
रविवार पेठ कापडगंज या ठिकाणी असलेलं हे पावणे दोनशे वर्ष जुनं मंदिर आहे.म्हणजे या मंदिराची स्थापना 1849 मध्ये करण्यात आली आणि हे मंदिर माहेश्वरी समाजाच्या वतीने चालवले जाते.
प्राची केदारी, प्रतिनिधी
पुणे : पुणे शहरात अनेक जुन्या वास्तू मंदिर आहेत. त्यातीलच एक म्हणजे रविवार पेठ येथील श्रीराम मंदिर. हे मंदिर जवळपास पावणे दोनशे वर्ष जुने मंदिर आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे आज पुणे दौर्यावर होते. त्यावेळी माहेश्वरी समाजाच्या श्रीराम मंदिरामध्ये दर्शनास यावे, असा आग्रह नागरिकांनी केला.
त्यावर अजित पवार हे मंदिरात जाण्यास निघाले. त्यावेळी मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ अजित पवार यांना कचर्याचा ढीग दिसला. हा कचऱ्याचा ढीग दिसताच इतके भव्य दिव्य मंदिर असून येथील कचरा उचलला नाही. कोणीही असले तरी साफसफाई ठेवली पाहिजे, अशा शब्दात अजित पवारांनी बाजूला असलेल्या विश्वस्तांना सांगितले.
advertisement
काय आहे या मंदिराचा इतिहास -
रविवार पेठ कापडगंज या ठिकाणी असलेले हे पावणे दोनशे वर्ष जुने मंदिर आहे. या मंदिराची स्थापना 1849 मध्ये करण्यात आली. हे मंदिर माहेश्वरी समाजाच्या वतीने चालवले जाते. मंदिरामध्ये विविध कार्यक्रमाच आयोजनही केले जाते. रामनवमी, हनुमान जयंती, झुला उत्सव, गोपाळकाला, असे सणदेखील मोठ्या उत्सहात या मंदिरात साजरे केले जातात.
advertisement
पुरुषांसाठी स्टायलिश शॉर्ट कुर्ते, तेही अगदी बजेट फ्रेंडली; मुंबईतील हे मार्केट आहे तुमच्यासाठी बेस्ट
मागील 22 वर्षांपासून मी मंदिराची सेवा करत आहे. हे खूप जुनं मंदिर आहे. माहेश्वरी समाजाच्या माध्यमातून हे मंदिर चालवले जाते. खूप मोठे असे हे मंदिर आहे. प्रभू रामाच्या दर्शनासाठी अनेक भाविक इथे येतात, अशी माहिती मंदिराचे पुजारी ओम पांडे यांनी दिली.
Location :
Pune,Maharashtra
First Published :
August 16, 2024 7:42 PM IST