TRENDING:

National Politics : देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होणार? शरद पवारांचे संकेत; जयंत पाटील म्हणाले..

Last Updated:

National Politics : येत्या महिन्याभरात दिल्लीत मोठी उलथापालथ होणार असल्याचे संकेत खुद्ध शरद पवार यांनी दिल्याची माहिती शेकाप नेते जयंत पाटील यांनी दिली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पंढरपूर, (विरेंद्रसिंह उत्पात, प्रतिनिधी) : आगामी विधानसभा निवडणुकीला अवघे काही महिने उरले आहेत. अशात प्रत्येक राजकीय पक्ष अंग झटकून कामाला लागले आहे. भेटीगाठी वाढल्या आहेत, वेगवेगळे मेळावे होतायेत, आयाराम गयारामांची संख्याही वाढत आहे. दरम्यान, विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत मोठे फेरबदल होण्याची शक्यता आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांनी पक्षाच्या अधिवेशनातून ही माहिती दिली आहे.
News18
News18
advertisement

दिल्लीत मोठी उलथापालथ होणार : जयंत पाटील

देशाच्या राजकारणामध्ये दिल्लीत येत्या महिन्यात मोठ्या उलाढाली होणार आहेत. यासाठी आपण शेकाप अधिवेशनसाठी येऊ शकणार नाही, अशी माहिती खुद्द शरद पवार यांनी शेकाप नेते जयंत पाटील यांना दिली. हीच माहिती जयंत पाटील यांनी शेकाप अधिवेशनात जाहीर सांगितली. यानिमित्ताने देशाच्या राजकारणात काही तरी नव्या घडामोडी दिल्लीतील राजकारणात होत असल्याचे संकेत शरद पवार यांनी दिले आहेत.

advertisement

शरद पवार हे पंढरपुरात शेतकरी कामगार पक्षाचे अधिवेशनासाठी येणार होते. मात्र, पवार यांचा दौरा ऐनवेळी रद्द झाला. पवार यांनी दौरा रद्द करत असताना जयंत पाटील यांना फोन करून दिल्लीतील उलाढालीमुळे आपण येऊ शकणार नसल्याचे कारण सांगितले. पवार यांनी सांगितलेल्या कारणामुळे देशाच्या राजकारणात आता खळबळ उडाली आहे. शेकाप नेते जयंत पाटील यांनी आपण दिल्लीतील भाजपा सरकार पाडुनच शेकापच्या कार्यक्रमाला या. आम्ही आपले आनंदाने स्वागत करू असे सांगितले असल्याचेही यावेळी जाहीर केले.

advertisement

वाचा - 'आपले मुख्यमंत्रिपद हे महाराष्ट्रासाठी कलंक' राणेंची ठाकरेंवर घणाघाती टीका

शेकापचे 2 दिवसीय अधिवेशन

02 व 03 ऑगस्ट रोजी पंढरपूर येथे भारतीय शेतकरी कामगार‌ पक्षाचे 19 वे अधिवेशन सुरू आहे. या अधिवेशनास ज्येष्ठ नेते शरद पवार प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती राहणार होते. तर, उद्धाटन मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी आॕफ इंडिया पक्षाचे सरचिटणीस कॉम्रेड दीपाशंकर भट्टाचार्य यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी शेकापचे सरचिटणीस जयंत पाटील यांनी मार्गदर्शन केलं. आगामी विधानसभा निवडणूक डोळ्यांसमोर ठेऊन शेतकरी कामगार पक्षाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/सोलापूर/
National Politics : देशाच्या राजकारणात मोठे फेरबदल होणार? शरद पवारांचे संकेत; जयंत पाटील म्हणाले..
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल