Maharashtra Politics : 'आपले मुख्यमंत्रिपद हे महाराष्ट्रासाठी कलंक' नारायण राणेंची ठाकरेंवर घणाघाती टीका

Last Updated:

Maharashtra Politics : भाजप नेते नारायण राणे यांनी उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर घणाघाती टीका केली आहे.

News18
News18
मुंबई : आगामी विधानसभा निवडणूक जसजशी जवळ येत आहे. त्याप्रमाणे राजकीय वाकयुद्ध पेटताना पाहायला मिळत आहे. शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांनी नुकतेच मुंबईत पक्षाच्या पदाधिकाऱ्यांचा मेळावा घेतला. या मेळाव्यातून त्यांनी थेट पंतप्रधान मोदी यांना आव्हान दिलं आहे. तसेच सत्ताधारी भाजप नेत्यांवरही सडकून टीका केली. भाजपकडूनही जोरदार पलटवार केला जात आहे. भाजप नेते नारायण राणे यांनी आता उद्धव ठाकरे यांना लक्ष्य केलं आहे. सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सच्या माध्यमातून
नारायण राणे काय म्हणाले?
उद्धव ठाकरे यांची माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चॅलेंज देण्याची औकात व लायकी नाही. लोकशाहीमध्ये निवडणुकीत जागा कमी जास्त होतात. भाजपने काही पहिल्यांदा निवडणूक लढलेली नाही. माननीय नरेंद्र मोदीजी अनेक निवडणुकांना सामोरे गेलेले आहेत. त्यामुळे त्यांना घाम फुटण्याचा प्रश्नच उदभवत नाही. माननीय नरेंद्रजी मोदींबद्दल हे वाक्य उदगारताना जनाची नाही तर मनाची तरी ठेवावी. उद्धव वाकड्यात शिरले तर वाकडे पणाला चोख उत्तर देवून भाजप सरळ केल्याशिवाय राहणार नाही. राजकारणातील माणसे षंड आहेत असे आपण म्हणालात. आपण आत्मपरीक्षण करा, षंढ शब्दाचा अर्थ कोणाशी जवळीक साधतो, अशी टीका राणे यांनी केली.
advertisement
आपलं मुख्यमंत्रीपद कलंक : राणे
राणे यांनी पुढे लिहिलंय, की आपले मुख्यमंत्री पद हे महाराष्ट्रासाठी कलंक होते. आपल्या अडीच वर्षाच्या कालावधीत विकासाच्या बाबतीत महाराष्ट्र 10 वर्ष मागे गेला तेव्हा लोक म्हणायचे अडीच वर्षात दोनदा मंत्रालयात जाणाऱ्या मुख्यमंत्र्याची कीव करावीशी वाटते. काही झाले तरी आपले स्वप्न आम्ही पुरे होवू देणार नाही. भविष्यकाळात महाराष्ट्रात कोण राहील हे महाराष्ट्राची जनता ठरवेल. स्वःताचे कौतुक करून घेवून आपण अडीच वर्षात भीम पराक्रम केल्याच्या फुशारक्या मारत आहात त्याला लवकरच चोख उत्तर देऊ. एक लक्षात ठेवा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस एकटे नाहीत. आम्ही त्यांच्या सोबत आहोत. भाजप व आर.एस.एस. त्यांच्या सोबत आहे. मातोश्रीत बसून धमकीची भाषा षंढच करू शकतो, असा पलटवार राणेंनी केला.
view comments
मराठी बातम्या/मुंबई/
Maharashtra Politics : 'आपले मुख्यमंत्रिपद हे महाराष्ट्रासाठी कलंक' नारायण राणेंची ठाकरेंवर घणाघाती टीका
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement