'...तर मी राजकारण सोडेन'; वेषांतराच्या आरोपांवर अजितदादा संतापले, राउतांना खुलं चॅलेंज
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
अजित पवार यांनी संजय राऊत यांच्या आरोपांवर जोरदार पलटवार करत त्यांना चॅलेंज दिलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
नाशिक, प्रतिनिधी : उपमुख्यमंत्री अजित पवार हे वेषांतर करून दिल्लीला गेल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे नेते खासदार संजय राऊत यांनी केला होता. संजय राऊत यांच्या या आरोपांवर आता अजित पवार यांनी जोरदार पलटवार केला आहे. 'मी वेषांतर करुन कुठेही गेलो नाही, वेषांतर करुन गेलो हे साफ खोटं आहे, आरोप करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेन' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे. ते नाशिकमध्ये बोलत होते.
नेमकं काय म्हणाले अजित पवार?
'मी वेषांतर करुन कुठेही गेलो नाही, वेषांतर करुन गेलो हे साफ खोटं आहे, आरोप करणाऱ्यांना लाज वाटली पाहिजे, आरोप सिद्ध झाल्यास मी राजकारण सोडेन. फेक नॅरेटिव्ह सेट केला जात आहे. मी लपून छपून जाणार नाही, उघड माथ्याने जाईन. मी नाव बदलून कधीच प्रवास केला नाही. वेश बदलून दिल्लीत गेलो असतो तर संसदेत तपासावं. वेषांतराचा आरोप सिद्ध न झाल्यास तुम्ही संन्यास घ्या' असं अजित पवार यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान अजित पवार हे नाशिक दौऱ्यावर आहेत, मात्र त्यांच्या या दौऱ्यावेळी मंत्री छगन भुजबळ हे गैरहजर आहेत. त्यामुळे चर्चेला उधाण आलं आहे. यावर देखील अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. भुजबळ आणि मी कुटुंब म्हणून काम करतो, कालच्या बैठकीला भुजबळ गेले होते
आज ते दुसऱ्या ठिकाणी गेले आहेत, म्हणून गैरहजर असल्याचा खुलासा अजित पवार यांनी केला आहे.
view commentsLocation :
Nashik,Nashik,Maharashtra
First Published :
August 02, 2024 11:07 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/नाशिक/
'...तर मी राजकारण सोडेन'; वेषांतराच्या आरोपांवर अजितदादा संतापले, राउतांना खुलं चॅलेंज


