दीड आणि पाच दिवसांच्या गणपती विसर्जनानंतर अनेकांनी परतीचा प्रवास सुरू केला आहे. सोमवारी रत्नागिरी आगारातून 5 एसटी बसेस मुंबईकडे रवाना झाल्या आहेत. तर 2 सप्टेंबर रोजी 190 रिझर्व्ह आणि 31 ग्रुप बुकींगच्या अशा एकूण 221 एसटी बसेस मुंबईला जातील. रत्नागिरी विभागातून 2 ते 7 सप्टेंबरपर्यंत मुंबईकडे एसटी बसेसच्या 21 हजार 139 फेऱ्या होणार आहेत.
advertisement
Ratnagiri: गणेश विसर्जनाला वाहतूक मार्गात मोठे बदल, रत्नागिरीतील हे मार्ग बंद, पाहा पर्यायी रस्ते
गणेशोत्सवानिमित्त एसटी महामंडळाच्यावतीने कोकणात 5 हजार 200 बसेस सोडण्यात आल्या होत्या. त्यापैकी 2950 एसटी बसेस एकट्या रत्नागिरी जिल्ह्यात दाखल झाल्या होत्या. आता गौरी विसर्जनानंतर सात दिवसांच्या बाप्पाचंही विसर्जन होणार आहे. त्यानंतर कोकणात आलेले बहुतांशी नोकरदार गणेशभक्त मुंबईला परत निघतील.
दरवर्षीप्रमाणे, यावर्षी देखील राज्यातील एसटी महामंडळाने गणेशोत्सवासाठी विशेष सेवा देण्याची तयारी केली होती. गणेश चतुर्थीनिमित्त कोकणासह विविध जिल्ह्यांमध्ये ज्यादा बस सोडण्यात आल्या होत्या. आता विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर देखील ज्यादा बस गाड्यांची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे लालपरीने प्रवास करणाऱ्या सर्वसामान्य नागरिकांना फायदा होणार आहे.
