'मराठी आलं नाही तर काय फरक पडतो?' कल्याणमधील पटेल मार्टमध्ये महिला कर्मचारी तरुणीची अरेरावी
दिवाळी सणानिमित्त कोकण रेल्वेवर विशेष रेल्वे चालवण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे. प्रवाशांना सणासुदीच्या काळामध्ये रेल्वेचे तिकिट उपलब्ध होत नाहीत. प्रवाशांची हिच बाब लक्षात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मध्य रेल्वेच्या काही प्रमुख रेल्वे स्थानकांवर विशेष ट्रेन चालवण्याचा निर्णय घेतलाय. प्रवाशांच्या सोयीसाठी 25 सप्टेंबर ते 27 नोव्हेंबर या कालावधीत मडगावमार्गे विशेष गाडी क्र. 01463/ 01464 लोकमान्य टिळक टर्मिनस- तिरुवनंतपूरम- लोकमान्य टिळक टर्मिनस (साप्ताहिक विशेष) ही रेल्वे सोडण्याचा निर्णय मध्य रेल्वेने घेतला आहे.
advertisement
बहिणीचं निधन झालं, सुरेश सगळीकडे फिरला, कुणीचं आलं नाही मदतीला!
लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुवनंतपुरम- (साप्ताहिक) 01463 क्रमांकाची गाडी लोकमान्य टिळक टर्मिनसहून दर गुरुवारी दुपारी 04: 00 वा. सुटेल. तिरुवनंतरपुरम येथे दुसऱ्या दिवशी रात्री 10: 45 वा. पोहचेल. तर, तिरुवनंतपूरम ते लोकमान्य टिळक टर्मिनस- (साप्ताहिक) 01464 क्रमांकाची गाडी तिरुवनंतपुरम वरून 27 सप्टेंबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत दर शनिवारी दुपारी 04:20 वा. सुटेल व लोकमान्य टिळक टर्मिनस येथे तिसऱ्या दिवशी रात्री 01: 00 वा. पोहचेल. ही गाडी थिवी, करमळी आणि मडगाव या स्थानकांवर थांबा घेईल.