TRENDING:

बाग सुखाची करपून गेली...दादांचे पार्थिव पाहताच सुनेत्रा वहिनी कोलमडल्या, लेकाने सावरलं अन् सुनेने धीर दिला

Last Updated:

सुनेत्रा पवार यांच्या मनातील घालमेल त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसली आणि या भेटीदरम्यानचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होताच ते पाहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात कालवाकालव झाली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई : अजित पवारांच्या निधनाने अवघा महाराष्ट्र शोकाकुल झाला आहे. बारामती विमानतळावर भीषण अपघातात निधन झाले. विमानाचा अपघात झाल्यानंतर जमिनीवर कोसळल्यानंतर अक्षरश: कोळसा झाला. त्यामुळे या भयावह अपघातात अजित पवारांसह पाच जणांचा मृत्यू झाला. अजित पवार हे मुंबईहून विमानाने बारामती विमानतळावर उतरत असताना अपघात झाला. लँडिंगच्या प्रयत्नात विमान रनवे च्या बाजूला जाऊन अपघातग्रस्त झाले. अजित पवारांचे पार्थिवाचे दर्शन सकाळपासून कोणीच घेतले नव्हते. अजित पवारांचे पार्थिव पाहिल्यानंतर कुटुंबियातील सगळ्यांच्याच भावनांचा बांध फुटला. मात्र सर्वात जास्त धक्का हा पत्नी सुनेत्रा पवार यांना बसला आहे.
News18
News18
advertisement

अजित पवारांचे अकाली जाणे हे पत्नी सुनेत्रा पवार यांच्यासाठी मोठा धक्का आहे. बारामतीत आप्तेष्ठांना मिठी मारून रडणाऱ्या सुनेत्रा पवार सुनेत्रा पवारांना पाहून काळजाचा ठोका चुकला. रुग्णालयता देखील सुनेत्रा पवार दोन्ही हात जोडून, आपल्यापुढं असणारं डोंगराएवढं दु:ख सावरत अगदी नि:शब्द होऊन प्रथमदर्शनी रुग्णालयातीलच एका खोलीत बसल्याचं पाहायला मिळालं. अजित पवारांचे पार्थिव पाहिल्यानंतर सुनेत्रा पवारांच्या पायाखालची जमीन सरकली. त्यावेळी मुलाने आणि सुनेने सुनेत्रा पवारांना सावरले. त्यानंतर लगेच सुप्रिया सुळेंसाठी खुर्ची मागवली.

advertisement

सुनेत्रा पवारांचे डोळे अबोल, चेहरा निस्तेज

राजकारणात दादांवर कितीही टीका झाली, कितीही संकटे आली, तरी सुनेत्रा वहिनी त्यांच्या मागे हिमालयासारख्या उभ्या राहिल्या. बारामतीचा विकास असो वा सामाजिक कार्य, वहिनींनी दादांचा भार हलका केला. आजही कोणत्याही कार्यक्रमात जेव्हा दादा गाण्याच्या मैफिलीत रमत किंवा मिश्किल टिप्पणी करत, तेव्हा वहिनींच्या डोळ्यांतील कौतुक बरंच काही सांगून जायचं. मात्र आज सुनेत्रा पवारांचे डोळे अबोल, चेहरा निस्तेज होता.

advertisement

37 वर्षांच्या प्रवासाला नियतीने अर्ध्यावरच खिळ

राजकारणात 'दादा' जितके कठोर वाटायचे, तितकेच ते त्यांच्या कौटुंबिक आयुष्यात सुनेत्रा वहिनींच्या साथीने समृद्ध होते. आज या 37 वर्षांच्या प्रवासाला नियतीने अर्ध्यावरच खिळ लावली आहे. अजित पवारांचे अकाली जाणे ही घटना पवार कुटुंबासाठी आणि महाराष्ट्रासाठी कधीही भरून न निघणारी पोकळी निर्माण करून गेली आहे.

advertisement

advertisement

सुनेत्रा पवार कोलमडलेल्याच अवस्थेत बारामतीत दाखल

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
आल्याचे दर वाढले, शेवगा आणि डाळिंबाला काय मिळाला भाव? इथं चेक करा
सर्व पहा

अजित पवारांच्या निधनाचं वृत्त समोर येताच संपूर्ण राज्य हादरलं. अर्थसंकल्पीय अधिवेशनासाठी दिल्लीमध्ये असणाऱ्या त्यांच्या पत्नी खासदार सुनेत्रा पवार, बहीण- खासदार सुप्रिया सुळे यांच्यापर्यंत विमान दुर्घटना आणि त्यानंकर झालेल्या या अप्रिय घटनेची माहिती पोहोचली आणि नेमकं काय आणि कसं व्यक्त व्हावं हेच या कुटुंबीयांना कळेना. इथं विमान दुर्घटनास्थळावरून अजित पवार यांचं पार्थिव प्रथम रुग्णालयात नेण्यात आलं आणि तिथं त्यांच्या पत्नी, सुनेत्रा पवार कोलमडलेल्याच अवस्थेत बारामतीत दाखल झाल्या. यावेळी त्यांचे सुपुत्र  पार्थ पवार आणि सुप्रिया सुळे त्यांच्यासोबत होते. सुनेत्रा पवार यांच्या मनातील घालमेल त्यांच्या चेहऱ्यावरून स्पष्ट दिसली आणि या भेटीदरम्यानचे फोटो समाजमाध्यमांवर प्रसिद्ध होताच ते पाहणाऱ्या प्रत्येकाच्याच मनात कालवाकालव झाली.

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
बाग सुखाची करपून गेली...दादांचे पार्थिव पाहताच सुनेत्रा वहिनी कोलमडल्या, लेकाने सावरलं अन् सुनेने धीर दिला
Advertisement
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल