TRENDING:

Sunetra Pawar: 'लवकर या, लवकर जा योजने'ची घोषणा, सुनेत्रा पवारांचं पहिलचं भाषण, महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट

Last Updated:

Sunetra Pawar Speech: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधीमंडळातील आपलं पहिल भाषण केले. विधान परिषदेत केलेल्या भाषणात सुनेत्रा पवार यांनी महिलांच्या प्रश्नाबाबत भाष्य केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
मुंबई: राज्याच्या उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधीमंडळातील आपलं पहिल भाषण केले. विधान परिषदेत केलेल्या भाषणात सुनेत्रा पवार यांनी महिलांच्या प्रश्नाबाबत भाष्य केले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी विधान परिषदेत शासकीय महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठी घोषणा केली.
विधीमंडळात सुनेत्रा पवारांचे पहिलेच भाषण अन् महिलांसाठी गिफ्ट!  'लवकर या, लवकर जा योजने'ची घोषणा...
विधीमंडळात सुनेत्रा पवारांचे पहिलेच भाषण अन् महिलांसाठी गिफ्ट! 'लवकर या, लवकर जा योजने'ची घोषणा...
advertisement

मुंबईतील शासकीय कार्यालयांत काम करणाऱ्या महिला कर्मचाऱ्यांसाठी आणि राज्यातील मातांसाठी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी आज विधान परिषदेत दिलासादायक घोषणांचा पाऊस पाडला आहे. मुंबईच्या उपनगरीय रेल्वे आणि रस्त्यांवरील गर्दीतून प्रवास करणाऱ्या महिलांची ओढाताण थांबवण्यासाठी 'लवकर या, लवकर जा' ही अभिनव संकल्पना राबविण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे.

प्रवासातील ओढाताण थांबणार, '३० मिनिटांचा' मास्टरस्ट्रोक

advertisement

मुंबई महानगर क्षेत्रातील (MMR) शासकीय महिला कर्मचाऱ्यांच्या वेळेत लवचिकता आणण्याचा प्रयत्न सरकारने केला आहे. सकाळी ९.१५ ते ९.४५ या वेळेत कार्यालयात लवकर येऊन जितकी मिनिटे आधी काम सुरू करतील, तितकीच मिनिटे संध्याकाळी कार्यालयातून लवकर निघण्याची मुभा महिलांना मिळणार आहे. ही सवलत जास्तीत जास्त ३० मिनिटांपर्यंत असेल. यामुळे मुंबईतील पीक अवर (Peak Hour) गर्दीतून महिलांची सुटका होण्यास मोठी मदत होणार आहे.

advertisement

मातृत्वाचा सन्मान, १८० दिवसांची प्रसूती रजा

टॉप व्हिडीओज

सर्व पहा
शिक्षण फक्त दहावी, गावात राहून इंजिनिअरपेक्षा जास्त कमाई, शेतकऱ्यानं काय केलं? V
सर्व पहा

दुसऱ्या एका महत्त्वाच्या निर्णयात, सुनेत्रा पवार यांनी नोकरदार महिलांना केंद्र सरकारच्या धर्तीवर तब्बल १८० दिवसांची (६ महिने) प्रसूती रजा मंजूर करण्याची घोषणा केली आहे. इतकेच नव्हे, तर प्रसूती रजेनंतर गरज भासल्यास १ वर्षापर्यंत वैद्यकीय प्रमाणपत्राशिवाय देय अर्धवेतन रजा देण्याचाही ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला आहे. महिलांना कुटुंब आणि नोकरी यांचा समतोल साधता यावा, यासाठी हे पाऊल उचलल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Sunetra Pawar: 'लवकर या, लवकर जा योजने'ची घोषणा, सुनेत्रा पवारांचं पहिलचं भाषण, महिला कर्मचाऱ्यांसाठी मोठं गिफ्ट
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल