नोकरी सोडली, सुरू केला स्वतःचा व्यवसाय, मराठी दाम्पत्य आज करताय लाखोंची उलाढाल
खूप कमी पदांसाठी ही भरती केली जात आहे. जेमतेम 30 पदांचाच भरतीमध्ये समावेश आहे. त्यापैकी 16 पदे सर्वसाधारण प्रवर्गासाठी राखीव आहेत. तर, अनुसूचित जातीसाठी 4 जागा तर अनुसूचित जमातीसाठी 2 जागा आहेत. ओबीसी प्रवर्गासाठी 8 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत. अर्ज भरताना सर्वात आधी अर्जदारांनी जाहिरात व्यवस्थित वाचूनच अर्ज भरावा. अर्जदाराकडे कोणत्याही मान्यताप्राप्त विद्यापीठाची पदवी असावी. याशिवाय, इंग्रजी शॉर्टहँडमध्ये प्रति मिनिट 120 शब्द आणि कम्प्यूटर टायपिंगमध्ये प्रति मिनिट 40 शब्दांचा वेग असणे आवश्यक आहे. अर्ज भरताना याचे प्रमाणपत्र आवश्यक आहेत.
advertisement
भुलेश्वर मार्केटमध्ये फक्त ₹550 पासून घागरा-चनिया चोली
याशिवाय, अर्जदाराकडे अर्ज भरताना स्टेनोग्राफी किंवा सेक्रेटरी पदाचा किमान 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. अनुभव असल्याचा सर्टिफिकेटही अर्जदाराकडे असावे. एकूण शैक्षणिक पात्रता आणि उमेदवराचा अनुभव वैगेरे पाहता अर्जदाराचे वय 30 ते 45 वर्षांच्या मध्येच असलं पाहिजे. सामान्य श्रेणीतील उमेदवारांना 1500 रूपये आणि अनुसूचित जाती, जमाती, ओबीसी, दिव्यांग, माजी सैनिक आणि स्वातंत्र्य सैनिकांच्या अवलंबितांना अर्ज शुल्क म्हणून 750 रुपये भरावे लागतील. हे पेमेंट युको बँक पेमेंट गेटवे द्वारे करता येईल. अर्जाच्या तारखा लवकरच जाहीर केल्या जातील असं देखील सांगितलं जात आहे.
महिलांनी हृदयाचे आरोग्य उत्तम कसे राखावे? जाणून घ्या तज्ञांचे मत…
अर्जाच्या अंतिम तारखेची माहिती उमेदवारांना वेळोवेळी अधिकृत वेबसाइटवरून मिळेलच. अर्जाची शेवटची तारीख अनेकदा बदलली सुद्धा जाते. भरतीची निवड प्रक्रिया चार टप्प्यांमध्ये पूर्ण करण्यात येणार आहे. सर्वात आधी शॉर्टहँड टायपिंग टेस्ट होईल. त्यानंतर ऑब्जेक्टिव्हची लेखी परीक्षा होईल. पुढच्या टप्प्यात संगणक टायपिंग स्पीड टेस्ट घेतली जाईल आणि शेवटी पात्र उमेदवारांची मुलाखत होणार आहे. या सर्व टप्प्यांमधून यशस्वीरीत्या पूर्ण झाल्यानंतरच उमेदवारांची अंतिम निवड केली जाईल. निवडलेल्या उमेदवारांना पे मॅट्रिक्स लेव्हल 11 अंतर्गत 67 हजार 700 रुपये सुरुवातीचं वेतन असेल. याशिवाय, सरकारी नियमांनुसार इतर भत्ते देखील दिले जातील.