TRENDING:

Suresh Kalmadi: सुरेश कलमाडींची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल; शरद पवार भेटीला

Last Updated:

सुरेश कलमाडी यांना दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले असून सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

impactshort
इम्पॅक्ट शॉटतुमचा गेटवे लेटेस्ट न्यूज
advertisement
पुणे :  पुण्याचे माजी खासदार आणि माजी केंद्रीय मंत्री सुरेश कलमाडी यांची प्रकृती बिघडल्याने त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं. दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले आहे, सध्या त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. आता त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं सांगण्यात येतंय. सुरेश कलमाडींच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद त्यांच्या भेटीसाठी गेले होते.
News18
News18
advertisement

सुरेश कलमाडी बऱ्याच कालावधीपासून राजकारणापासून दूर आहेत. कुठल्याही कार्यक्रमात आणि समारंभात ते दिसून आलेले नाहीत. गेल्या काही दिवसापासून कलमाडी आजारी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत . त्यानंतर आज शरद पवार हे त्यांच्या भेटीसाठी गेले होते. जवळपास 20 मिनिट शरद पवारांनी त्यांच्याशी चर्चा केली.

सबसे बडा खिलाडी, अशी ओळख

सबसे बडा खिलाडी, सुरेशभाई कलमाडी असे काही दशकांपूर्वी पुण्यात म्हटलं जायचं. पुण्यापासून पार्लमेंटपर्यंत कलमाडींचा दरारा होता. पण आज त्याच कलमाडींना ओळखणं सुद्धा अवघड होईल. अशी त्यांची स्थिती आहे. कलमाडी म्हणजे पुण्याचं राजकारण आणि पुण्याचं राजकारण म्हणजे कलमाडी अशी होती. राजकीय वर्तुळात त्यांना 'भाई' म्हणून ओळखले जात होते. त्यांचा दरारा एवढा होती की त्यांच्या शब्दाच्यापलीकडे कोणी नव्हते. १९९५ ते २००७ या काळात कलमाडी काँग्रेसचा चेहरा होते. मात्र राष्ट्रकुल घोटाळाप्रकरणी भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर त्यांच्या राजकारणला उतरती कळा लागली.

advertisement

भ्रष्टाचाराचा आरोप महागात पडला

भ्रष्टाचाराचे आरोप झाल्याने कलमाडींना काँग्रेसमधून निलंबित करण्यात आलंय. त्यानंतर त्यांचा दबदबा कमी झाला . भ्रष्टाचाराचे आरोप झाल्यानंतर नऊ महिने ते तिहार जेलमध्ये होते. पुण्यात 2010 मध्ये कॉमनवेल्थ गेम्स झाल्या. या स्पर्धेच्या आयोजन समितीचे ते अध्यक्ष होते. यानिमित्तानं त्यांनी पुण्यात कोट्यवधी रुपये आणले. क्रीडानगरी सुसज्ज करण्याबरोबरच पुण्याच्या काही भागांतील रस्ते, सुशोभीकरण अशी अनेक कामं केली. पण या गेम्समध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप त्यांना महागात पडला.

advertisement

मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Suresh Kalmadi: सुरेश कलमाडींची तब्येत बिघडली, रुग्णालयात दाखल; शरद पवार भेटीला
बातम्या
फोटो
व्हिडिओ
लोकल