संशोधन सहाय्यक पदासाठी शेवटची तारीख 14 ऑक्टोबर 2025 आहे, तर कनिष्ठ विद्युत अभियंता पदासाठी शेवटची तारीख 10 ऑक्टोबर 2025 आहे. संशोधन सहाय्यक पदासाठीचे आवश्यक शैक्षणिक पात्रता, लायब्ररी अँड इन्फॉर्मेशन सायन्स विभागामध्ये मास्टरची पदवी आवश्यक आहे, भाषेवर प्रभुत्व हवं, उत्तमपणे लिहिता आणि वाचता यावं, संबंधित विभागातील ज्ञान आणि रिसर्च स्किलची आवश्यक, कोणत्याही संशोधन (Research) सॉफ्टवेअर वापरण्यामध्ये माहीर असावा अशी शैक्षणिक पात्रता आहे. या पदासाठीही अर्ज प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने असणार आहे. संशोधन सहाय्यक पदासाठी अर्जदाराला 25,000 इतका पगार आहे. इच्छुक उमेदवाराने akhilesh.yadav@tiss.edu या ईमेल वर आपला रिझ्युमे पाठवायचा आहे. पात्र उमेदवाराला 14 ऑक्टोबरनंतर मुलाखतीसाठी बोलावले जाईल. अधिकाधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची PDF वाचावी.
advertisement
दरम्यान, कनिष्ठ विद्युत अभियंता पदासाठी उमेदवाराकडे इलेक्ट्रिकल इंजिनियरिंगची पदवी असणं आवश्यक आहे. शिवाय, संबंधित विभागामध्ये 5 वर्षांचा अनुभव असणं आवश्यक आहे. अर्जदाराकडे इलेक्ट्रिकल इंजिनियरिंग संबंधितचं ज्ञान असणं आवश्यक असावे, उच्चतम पात्रता आणि अनुभव असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, Word, Excel आणि Power point मध्ये माहिर असलेल्या उमेदवारांना प्राधान्य दिले जाईल, शैक्षणिक संस्था, विद्यापीठ, केंद्र सरकारच्या कुठल्याही कार्यालयात नोकरी करणाऱ्या अर्जदाराला विशेष प्राधान्य दिले जाईल. तुळजापूरमधील टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्सेस इथे ही नोकरीची संधी आहे. 45 वर्षापर्यंत असलेल्या उमेदवाराला प्राधान्य दिले जाईल, कनिष्ठ विद्युत अभियंता पदासाठी 35,000 रूपये इतके वेतन देण्यात येईल. अधिकाधिक माहितीसाठी इच्छुक उमेदवारांनी जाहिरातीची PDF वाचावी.